Home Breaking News Ghugus city@ news • जागतिक पोलिओ निर्मूलनात भारत अव्वल- किरण बोढे •...

Ghugus city@ news • जागतिक पोलिओ निर्मूलनात भारत अव्वल- किरण बोढे • घुग्घुस येथे पोलिओ लसीकरण मोहीम

206

Ghugus city@ news
• जागतिक पोलिओ निर्मूलनात भारत अव्वल- किरण बोढे

• घुग्घुस येथे पोलिओ लसीकरण मोहीम

✍️पंकज रामटेके
सुवर्ण भारत:सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घुस : पोलिओ लसीकरण मोहीम रविवार, ३ मार्च रोजी सकाळी ८ वाजता पासून राबविण्यात आली.

पोलिओ लसीकरण अंतर्गत दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी हे ब्रीदवाक्य घेऊन ५ वर्षा खालील प्रत्येक बालकाला पोलिओचा डोस देण्यासाठी ही मोहीम शहरात राबविण्यात आली.

अंगणवाडी केंद्र क्रमांक २ येथे प्रयास सखी मंच अध्यक्षा किरण बोढे यांनी भेट दिली व बालकांना पोलिओ डोस पाजला.

यावेळी प्रयास सखी मंच अध्यक्षा किरण बोढे, माजी जि.प. सभापती नितु चौधरी, माजी ग्रामपंचायत सदस्या वैशाली ढवस, आरोग्य सेविका किरण जुनघरे, सविता शेंडे, आरोग्य सेवक एस. डी. पावडे, नैना चिकाटे, प्रेमिका कांबळे आदी उपस्थित होते.