Home Breaking News Ghugus city@ news • एआयएमआयएमची जिल्हा कार्यकारणी गठीत • घुग्घुसचा प्रथम...

Ghugus city@ news • एआयएमआयएमची जिल्हा कार्यकारणी गठीत • घुग्घुसचा प्रथम नगराध्यक्ष एआयएमआयएमचा बनविण्याचे लक्ष

37

Ghugus city@ news
• एआयएमआयएमची जिल्हा कार्यकारणी गठीत

• घुग्घुसचा प्रथम नगराध्यक्ष एआयएमआयएमचा बनविण्याचे लक्ष

✍️पंकज रामटेके
सुवर्ण भारत:सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घुस :येथील विनेश कलवल यांची एआयएमआयएमच्या जिल्हा महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एआयएमआयएम पक्षाचा चंद्रपूर जिल्ह्यात प्रचार व प्रसार करण्यासाठी आणि क्षेत्रातील जनसामान्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने नियुक्ती करण्यात आली आहे.

एआयएमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांचे नुकतेच घुग्घुस नगरीत आगमन झाले होते. याप्रसंगी घुग्घुसचे शहराध्यक्ष सानू सिद्दीकी यांच्या नेतृत्वात एआयएमआयएमतर्फे खासदार इम्तियाज जलील यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीसह भव्य स्वागत करण्यात आले तसेच पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला तसेच घुग्घुस, पडोली ते चंद्रपूर पर्यंत भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली.

आगामी घुग्घुस नपच्या निवडणुकीसाठी एआयएमआयएमने मोर्चे बांधणी सुरु केली असून प्रथम नगराध्यक्ष एआयएमआयएमचा बनविण्याचे लक्ष आहे.

यावेळी ईद्रीस सय्यद, सोनू शेख, फर्रू पटेल, हस्सू सिद्दीकी, अनिश सिद्दीकी, फैझान शेख, समीर सय्यद, अयान सिद्दीकी, अफरोज खान, वहाब खान आदी उपस्थित होते.