Home Breaking News Nagbhid taluka news •मुस्लिम कब्रस्थान नागभिड येथील सागवान वृक्षतोड करून चोरी

Nagbhid taluka news •मुस्लिम कब्रस्थान नागभिड येथील सागवान वृक्षतोड करून चोरी

154

Nagbhid taluka news
•मुस्लिम कब्रस्थान नागभिड येथील सागवान वृक्षतोड करून चोरी

सुवर्ण भारत: अरुण रामुजी भोले
नागभिड तालूका प्रतिनिधी

नागभिड :नागभिड येथील मुस्लिम सार्वजनिक कब्रस्थान येथून सागवान वृक्षांची कत्तल करून चोरी करण्यात आल्याचे निदर्शनास आले.
गेल्या 20-25 वर्षापासुन मुस्लिम बांधव मुस्लिम सार्वजनिक कब्रस्थान येथील सागवान व इतर वृक्षांची देखरेख व संगोपन करत असायचे. या कब्रस्थानाच्या सभोवताली पक्की भिंत बांधण्यात आलेली आहे व समोर लोखंडी मजबूत गेट आहे व गेटला नेहमी ताला लावलेला असतो. गेटची चाबी जामा मस्जिद कमेटीचे अध्यक्षाकडे असते.आणि येण्याजान्या करिता एक लहानसा 2/6 चा गेट केलेला आहे या कब्रस्थानाचे जिम्मेदारी,देखरेख व व्यवस्थापन जामा मस्जिद कमेटी करीत असते. काही मुस्लिम बांधवांना कब्रस्थान येथे सागवान चोरी झाल्याचे निदर्शनास आले. कब्रस्थानमध्ये ट्रॅक्टर चे निशान स्पष्ट आढळून आले. व झाड़ाचे बुड सुद्धा स्पष्ट दिसत आहे सागवान वृक्षांची कत्तल करून लंपास केले. याआधी सुद्धा वृक्षतोडीचा प्रकार घडला आहे. यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पक्की भिंत व गेट असतांना सागवान वृक्षतोड करून चोरी कशी करण्यात आली ? गेटला ताला मग ट्रॅक्टर कब्रस्थान मध्ये कशी जाऊ शकते? संशयास्पद प्रश्न निर्माण झाले आहे. यावर तात्काळ योग्य चौकशी करून चोंराना पकडून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रियाज शेख,नासिर शेख,हमजा पठाण, सादिक शेख तसेच इतर मुस्लिम बांधव करीत आहेत.