Chandrapur city@ news
•सहज सुचलं महिला व्हाॅट्सअप गृपचे कार्य कौतुकास्पद -अनुश्री दहेगांवकर
सुवर्ण भारत: किरण घाटे (उपसंपादक)
चंद्रपूर – चंद्रपूर व -गडचिरोली ह्या जुळ्या जिल्ह्यातच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात नांव पोहचलेल्या महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं महिला व्हाॅट्सअप गृपचे कार्य अतिशय उल्लेखनीय व कौतुकास्पद असल्याचे मत चंद्रपूरातील सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या महिला सामाजिक कार्यकर्त्या अनुश्री दहेगांवकर यांनी आज सकाळी या प्रतिनिधीशी भ्रमनध्वनीवरुन बोलताना व्यक्त केले.नुकतीच आपण सहज सुचलंवरील एकता जुमडे यांची बातमी वाचली.सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक यांनी तिची भेट घेत सहज सुचलं परिवार तर्फे एकताचे अभिनंदन केले.गुणी कलावंताचा गौरव करणे सोबतच शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिल्याबद्दल महिला समाजसेविका अनुश्री दहेगांवकर यांनी सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका नागपूर निवासी मायाताई कोसरे अधिवक्ता मेघा धोटे व सहज सुचलंच्या सहसंयोजिका नलिनी आडपवार यांची प्रशंसा केली.दोन्ही जेष्ठ मार्गदर्शिकांंचे सहज सुचलं साठी मोठे योगदान असल्याच्या शेवटी दहेगावंकर म्हणाल्या!
