Ghugus City@ news
•घुग्घुस नगरपरिषद मध्ये स्थायी मुख्यधिकारी नियुक्ती करा:राजकुमार वर्मा
•आमदार किशोर जोरगेवार यांना निवेदनातून मागणी
सुवर्ण भारत: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी,चंद्रपूर
घुग्घुस दि.७ जुन २०२४ शुक्रवार रोजी यंग चांदा बिग्रेडचे संस्थापक तसेच आमदार किशोर जोरगेवार यांना घुग्घुस येथील नगरपरिषद कार्यालयात स्थायी मुख्यधिकारी मिळण्यात यावे,अशी निवेदनातून चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी (ग्रामीण)अनुसूचित जाती विभाग तालुकाध्यक्ष राजकुमार (दादू) वर्मा यांनी केली.
प्रशासकीय कामे पूर्ण करणे : नगरपरिषदेची सर्व कामे व योजना वेळेत व प्रभावीपणे पूर्ण होतील.
विकासकामांना गती : कायमस्वरूपी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विकासकामे वेगाने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करता येतात.
सार्वजनिक समस्यांचे निराकरण : परिसरातील लोकांचे प्रश्न तातडीने सोडवता येतील.
नियोजन आणि अंमलबजावणी : दीर्घकालीन योजना योग्य नियोजनाने राबवता येतात.
घुग्घुस प्रदेशाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व फायदे अत्यंत महत्त्वाचे आहेत.आ. किशोर जोंगरवार यांच्या सक्षम नेतृत्वाखाली हे शक्य होईल, असा घुग्घुसवासीयांना पूर्ण विश्वास आहे. घुग्घुस येथे कायमस्वरूपी मुख्याधिकारी नेमण्यासाठी नगरपरिषदेने आवश्यक ती पावले उचलण्याचा विचार करावा.
अशी निवेदनातून जिल्हा काँग्रेस कमिटी (ग्रामीण) अनुसूचित जाती विभागाचे तालुकाध्यक्ष राजकुमार वर्मा यांनी आ.किशोरभाऊ जोरगेवार यांना करण्यात आले.




