Home Breaking News Chandrapur dist@ news •चंद्रपूर एसीबी पथकाचा दणका ! •अभियंता व त्याचा...

Chandrapur dist@ news •चंद्रपूर एसीबी पथकाचा दणका ! •अभियंता व त्याचा मित्र अडकला जाळ्यात!

104

Chandrapur dist@ news
•चंद्रपूर एसीबी पथकाचा दणका !

•अभियंता व त्याचा मित्र अडकला जाळ्यात!

सुवर्ण भारत: किरण घाटे

चिमूर/चंद्रपूर :-विशेष प्रतिनिधी -पंचायत समिती कार्यालय चिमूर येथे ग्रामीण गृहनिर्माण अभियंता (कंत्राटी) पदावर कार्यरत मिलिंद मधुकर वाढई (२७) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले. तर त्यांचा मित्र आशिष कुशाब पेंदाम (२८) यांनाही ताब्यात घेण्यात आले असल्याचे वृत्त आहे.

चिमूर तालुक्यातील कळमगाव येथील शबरी योजना घरकुल लाभार्थी याचे दोन टप्प्यांची रक्कम देण्यात आली होती. मात्र नंतरच्या दोन टप्प्यातील रक्कमेसाठी पंचायत समिती कार्यालयात कार्यरत कंत्राटी अभियंता याने लाभार्थी कडून २० हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती १० हजार रुपये स्वीकारताना अभियंत्याला रंगेहाथ पकडण्यात आले असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी व कर्मचारी करीत आहेत.