Home Breaking News Korpna taluka @news •समाजाच्या अस्तित्वाची लढाई लढणारच, समाज आंदोलनाचा कर्णधार :- गजानन...

Korpna taluka @news •समाजाच्या अस्तित्वाची लढाई लढणारच, समाज आंदोलनाचा कर्णधार :- गजानन पाटील जुमनाके •कोरपना येथे आदिवासी समाजातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

154

Korpna taluka @news
समाजाच्या अस्तित्वाची लढाई लढणारच, समाज आंदोलनाचा कर्णधार :- गजानन पाटील जुमनाके

•कोरपना येथे आदिवासी समाजातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

 

कोरपना :- आदिवासी समाजावर होत असलेल्या अन्याय – अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवणारा आवाज सभागृहात जावा अशी सर्व समाज बांधवांची भावना आहे, समाज आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल तर समाजाच्या अस्तित्वाची लढाई आपण लढणारचं, शेवटी समाज हा सर्वोच्च स्थानी आहे, तो आंदोलनाचा कर्णधार आहे असे प्रतिपादन गोंडवाना शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गजानन पाटील जुमनाके यांनी केले ते कोरपना येथे आयोजित आदिवासी समाजातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते.

पुढे जुमनाके बोलताना म्हणाले की, राजुरा विधानसभा क्षेत्रात आदिवासी समाजाचा प्रभाव आहे, परंतु काहींनी फक्त समाजाचा वापर करून घेतला म्हणून समाजाने जागृत होऊन वापर करून घेणाऱ्यांना धडा शिकवावा असे आव्हानही त्यांनी या प्रसंगी केले.

या वेळी मंचावर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मेजर नामदेवरावजी किन्नाके, नगरसेवक ममताजी जाधव, माजी सभापती भीमराव मेश्राम, जेष्ठ नेते सुधाकर कुसराम, मेजर बंडुजी कुमरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते संजय सोयाम, संचालन संकेत कुळमेथे तर आभार मंगेश पंधरे यांनी मानले.