Home Breaking News Ghugus city@ news •वेकोली कॉलोनीतील स्कुल बस स्थानक तातळीने दुरुस्ती करा...

Ghugus city@ news •वेकोली कॉलोनीतील स्कुल बस स्थानक तातळीने दुरुस्ती करा – राजुरेड्डी •सब एरिया मॅनेजर यांना निवेदनातून मागणी

150

Ghugus city@ news

•वेकोली कॉलोनीतील स्कुल बस स्थानक तातळीने दुरुस्ती करा – राजुरेड्डी

•सब एरिया मॅनेजर यांना निवेदनातून मागणी

सुवर्ण भारत: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर

घुग्घुस : शहरातील शाळा शुरु झाल्या असून पावसाळ्याची ही सुरुवात झालेली आहे
वेकोलीच्या वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची मुलं व परिसरातील इतर नागरिकाचे विविध शाळेत शिक्षण घेण्यासाठी जात असतात तसेच या मुलांना बस पर्यंत पोहचविण्यासाठी पालक ही सोबत येत असतात
या मुलांना बसची प्रतीक्षा करण्यासाठी बस स्थानक निर्माण करण्यात आलेली आहे
ते अत्यंत जीर्ण अवस्थेत आले असून याठिकाणी मुलं उभे देखील राहू शकत नाही
पावसाच्या पाण्याने मुलांची तबीयत,पुस्तके व अन्य शालेय साहित्य खराब होण्याची शक्यता या करिता सदर बस स्थानकाची तातळीने दुरुस्ती करावी या करिता काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी व पदाधिकाऱ्यांनी वेकोली सब एरिया मॅनेजर सुधाकर रेड्डी यांना निवेदनातून मागणी केली असून सब एरिया यांनी ही दुरुस्तीचे आदेश दिले आहेत.