Home Breaking News Gadchiroli dist@news news • नाट्यश्री कविता स्पर्धेतील पंचेविसाव्या सत्रात पुनाजी कोटरंगे...

Gadchiroli dist@news news • नाट्यश्री कविता स्पर्धेतील पंचेविसाव्या सत्रात पुनाजी कोटरंगे विजयी

220

Gadchiroli dist@news news

• नाट्यश्री कविता स्पर्धेतील पंचेविसाव्या सत्रात पुनाजी कोटरंगे विजयी

गडचिरोली : स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली’ च्या वतीने “आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता ” हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते. या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते. या कवितेला “आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी” म्हणून पुरस्कृत करण्यात येते. व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते.
या उपक्रमाचे पंचेविसावे सत्र नुकतेच पार पडले असून यात ३५ कवींनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील कवी पुनाजी कोटरंगे यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या “तो माझा बाप” या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे. असे नाट्यश्री चे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे, व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.
पुनाजी कोटरंगे हे मौजा- गायडोंगरी, (ता. सावली, जिल्हा- चंद्रपूर) येथील रहिवासी असून नवोदित कवी आहेत. त्यांचे रोमन नावाचे कवितासंग्रह प्रकाशित झालेले असून अनेक कवितांचे लेखन त्यांनी केलेले आहे. अनेक वृत्तपत्रांतून त्याच्या कविता प्रकाशित झालेल्या आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे प्रा.‌अरुण बुरे, दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
या पंचेविसाव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने मिलींद खोब्रागडे, नरेंद्र गुंडेली, प्रिती ईश्वर चहांदे, अजय राऊत, जयराम धोंगडे,सोनाली रायपुरे (सहारे), गणेश रामदास निकम, संजय बन्सल, अतुल काशिनाथ गंडाटे, संगीता ठलाल, अशोक मांदाडे, तुळशीराम उंदीरवाडे, मुरलीधर खोटेले, पी. डी. काटकर, वंदना सोरते, सुरज गोरंतवार,रोहिणी पराडकर, डॉ. चंद्रकांत लेनगुरे, सुरेश गेडाम, वंदना मडावी, प्रभाकर दुर्गे, भिमानंद मेश्राम, स्वप्नील बांबोळे, प्रियंका वाकडे, प्रा. रेखा दिक्षित, संदिप आंबोरकर, पुनाजी कोटरंगे, मधुकर दुफारे, रंजना चुधरी, संतोष कपाले, खुशाल म्हशाखेत्री, रोशन येमुलवार, हरिष नैताम, सुजाता अवचट, डॉ. मंदा पडवेकर इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.
या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे.