Home Breaking News Gadchiroli Dist@News •माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी जाकेवार परिवाराला औषध उपचारासाठी आर्थिक...

Gadchiroli Dist@News •माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी जाकेवार परिवाराला औषध उपचारासाठी आर्थिक मदत!

22

Gadchiroli Dist@News
•माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी जाकेवार परिवाराला औषध उपचारासाठी आर्थिक मदत!

सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक)

अहेरी : तालुक्यातील येणकापल्ली येथील रुपेश जाकेवार यांना काही दिवसा अगोदर प्रकृती ठिक नसल्याने.त्यांनी चंद्रपूर येथे एका खाजगी दवाखान्यात भरती होऊन उपचार घेत आहे.जाकेवार यांची घरचा परिस्थिती अत्यंत गरिबीची असून त्यांना दवाखान्यात औषध व उपचार घेण्यासाठी आर्थिक अडचण भासत होते.

आविसं काँग्रेसचे नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना गावातील नागरिक तसेच कार्यकर्त्यांना कडून माहिती मिळताच त्यांनी जाकेवार कुटुंबाचे नातेवाईकांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करून रुपेश जाकेवार यांची प्रकृतीची माहिती जाणून घेतली.

आज त्या नातेवाईकांनी अजयभाऊ कंकडालवार यांची अहेरी जनसंपर्क कार्यालय येते अजयभाऊंची भेट घेऊन जाकेवार यांची कुटबाची आर्थिक परिस्थिती सांगितल्यानंतर माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी क्षणाचाही विलंब न करता जाकेवार परिवाराला औषध उपचाराकरीता आर्थिक मदत केली.

यापुढेही कोणत्याही कामासाठी आपण माझा संपर्कात रहा मी आपल्याला शक्य तो मदत करेन म्हणून जाकेवार कुटुंबियांना मोठा धीर दिला.या आर्थिक मदतीविषयी येणकापल्ली येथील जाकेवार कुटुंबातील सदस्यांनी अजयभाऊंचे आभार मानले.