Beed Dist @news
• मागण्या पूर्ण केल्या नाही तर तहसिलदारांना जाग आणण्यासाठी आंदोलन छेडणार: जिल्हाध्यक्ष यशवंत खंडागळे
सुवर्ण भारत:गोरख मोरे
बीड जिल्हा प्रतिनिधी
बीड :आष्टी तालुक्यातील विविध घटकातील लाभार्थी संबंधित अधिकाऱ्यांच्या कुचकामी धोरणांमुळे वंचीत राहिल्याने ,
डॉ बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे जिल्हाध्यक्ष यशवंत खंडागळे यांनी दिनांक २४ जून रोजी आष्टी तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले .
या मध्ये — १)संजय गांधी, श्रावण बाळ निराधार योजनेतील दाखल प्रकरणे मंजुर करणे,२)वृध्द कलाकारांना पेन्शन मंजूर करणे. ३) शासकीय गायरान जमीनीवरील सध्या स्थितीतील जमीन क्षेत्रावरील पिकांची पाहणी गाव नं.१ ईला नोंदी घेण्यात याव्यात . ४) रमाई,शबरी,ठक्कर बाप्पा योजनेतील हाप्ते लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करणे. ५) शैक्षणिक कामासाठी लागणारे जातीचे दाखले ३ दिवसांत देण्यात यावे , आदी विविध मागण्यांचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले असून , ३० जून पर्यंत वरिल सर्व मागण्या पूर्ण कराव्यात .
जर वरील मागण्या पूर्ण केल्या नाही तर , १ जूलै २०२४ रोजी आष्टी तहसील कार्यालयासमोर डॉ बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमच्या वतीने आष्टी तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांना सोबत घेऊन आष्टीच्या तहसीलदारांना जाग आणण्यासाठी आराधखाना आंदोलन छेडले जाईल , असा इशारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे जिल्हाध्यक्ष यशवंत खंडागळे यांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला आहे .


