Mul Taluka @News
•पत्रकार संजय पडोळेंना फोनवरून जिवानिशी मारण्याची धमकी
•धमकीचा फोन करणा-यावर कडक कारवाई करण्याची मुल तालुका पत्रकार संघाची मागणी !
• महसूलचे उपविभागीय अधिकारी व पोलिस उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर !
सुवर्ण भारत:किरण घाटे(उपसंपादक)
मूल:मुल तालुका पत्रकार संघाचे जेष्ठ सदस्य,व्हाईस ऑफ मीडियाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष तथा पुण्य नगरीचे तालुका प्रतिनिधी संजय पडोळे यांना जिवानिशी मारण्याचे धमकीचे फोन आल्याने मुल तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकारी व सदस्यगणांनी काल सोमवार दि.२४जूनला मूलचे उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, उपविभागीय पोलिस अधिकारी तहसिलदार मृदूला मोरे व पोलिस निरीक्षक यांची भेट घेत त्यांना एक लेखी निवेदन सादर केले.
कांग्रेसचे नेते प्रकाश मारकवार यांनी जेष्ठ पत्रकार संजय पडोळे यांना जिवानिशी मारण्याची फोन वरून धमकी दिली व परिवार संपविण्याची भाषा वापरली असे दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे.धमकीचे फोन करणा-यावर तातडीने कडक कारवाई करण्याची मागणी मुल तालुका पत्रकार संघाने केली आहे.निवेदन सादर करताना पत्रकार संघाचे अध्यक्ष राजू गेडाम उपाध्यक्ष युवराज चावरे, सचिव विनायक रेकलवार, सहसचिव विजय पाकमोडे यांच्यासह पत्रकार संघाचे सदस्य चंद्रकांत मनियार,दीपक देशपांडे,वासूदेव आगडे, गुरुदास गुरुनुले, भोजराज गोवर्धन, अशोक येरमे, गंगाधर कुणघाडकर व रविन्द्र बोकारे उपस्थित होते.


