Home Breaking News Varora taluka@ news •वरोरा विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळाचा गजर

Varora taluka@ news •वरोरा विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळाचा गजर

62

Varora taluka@ news
•वरोरा विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळाचा गजर

सुवर्ण भारत :पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर

वरोरा : विधानसभा निवडणूक 2024 च्या संदर्भाने मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक सपन्न झाली.
बैठकीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील 75 वरोरा विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी अनुकूल असल्याचे चंद्रपूर जिल्ह्यातील नेते मंडळी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पक्ष
श्रेष्टीला सांगितले.त्याअनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरोरा विधानसभा चे अध्यक्ष विलास धर्माजी नेरकर पक्षाच्या स्थापना पासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी एकनिष्ठ राहून सक्रिय कार्यकर्ते म्हणुन काम केले.पक्ष श्रेष्टीने त्यांची दखल घेतली आहे. विलास नेरकर यांनी विधानसभा क्षेत्राचा आढावा सांगितला आणि पूर्ण अहवाल सादर केला. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुनील तटकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा अशा सूचना विधानसभा अध्यक्ष विलास नेरकर यांना देण्यात आल्या आहे.

विलास धर्माजी नेरकर यांनी वरोरा व भद्रावती तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी मेहनत घेतली असून कार्यकर्त्यांची फळी उभी केली.राष्ट्रवादी पक्षाचे विभाजन होऊन होऊन दोन गट पडले असताना सुद्धा एकगठ्ठा पक्ष कार्यकर्ता मतदार हे विलास नेरकर यांच्या पाठीशी दिसून येत आहे. व्यावसायिक असुन व्यवसायिकांशी सालोख्याचे आणि प्रेमाचे संबंध आहे. शहरातील हिंदू -मुस्लिम तथा कोणत्याही समाजाच्या धार्मिक कार्यक्रम असो अथवा कोणत्याही सामाजिक कार्यात ते सक्रिय सहभाग घेऊन योगदान देत असतात. वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्रात ते सर्वत्र परिचित असून विधानसभा निवडणुकीत पक्ष श्रेष्टीने उमेदवारी दिली तर निश्चितच ते विजयी होतील असा आत्मविश्वास कार्यकर्त्यांना आहे असें चित्र दिसून येत आहे.