Home Breaking News Ballarpur city @news • सार्वजनिक शौचालयांची अवस्था सुधारा आप चे न.प.मुख्याधिकारीला...

Ballarpur city @news • सार्वजनिक शौचालयांची अवस्था सुधारा आप चे न.प.मुख्याधिकारीला निवेदन.

86

Ballarpur city @news

• सार्वजनिक शौचालयांची अवस्था सुधारा
आप चे न.प.मुख्याधिकारीला निवेदन.

सुवर्ण भारत: शहर प्रतिनीधी, बल्लारपूर

बल्लारपूर: आम आदमी पार्टी बल्लारपुर शहर तर्फे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विशाल वाघ यांना एक निवेदन देण्यात आले. बल्लारपूर शहरातील टेकडी,डेपो आणि बस्ती विभागातील सार्वजनिक शौचालयांची लवकर दुरूस्ती करून त्यांच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्यात यावे व गांधी संकुल, स्मशानभूमी, कारवा रोड आणि KGN मस्जिद परिसरातील शौचालयाकडे लक्ष द्यावे अशी मागणी शिष्टमंडळा तर्फे करण्यात आली.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष नागेश्वर गंडलेवार, शहराध्यक्ष रवि पुप्पलवार, शहर उपाध्यक्ष अफजल अली, गणेश सिलगमवार, शहर प्रवक्ता आसिफ शेख, शहर महिला अध्यक्षा किरण खन्ना, रेखा भोगे व इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.