Home Breaking News Chandrapur dist@news • येत्या १५ जूलै पासून चंद्रपूर जिल्ह्यातील महसूल कर्मचारी...

Chandrapur dist@news • येत्या १५ जूलै पासून चंद्रपूर जिल्ह्यातील महसूल कर्मचारी जाणार बेमुदत संपावर! • कोतवाल संघटनाही उतरणार या बेमुदत संपात ! • शासनाने प्रलंबित मागण्यांची दखल न घेतल्यामुळे राज्य महसूल कर्मचारी संघटनेने उपसले बेमुदत संपाचे हत्यार!

357

Chandrapur dist@news

• येत्या १५ जूलै पासून चंद्रपूर जिल्ह्यातील महसूल कर्मचारी जाणार बेमुदत संपावर!

• कोतवाल संघटनाही उतरणार या बेमुदत संपात !
• शासनाने प्रलंबित मागण्यांची दखल न घेतल्यामुळे राज्य महसूल कर्मचारी संघटनेने उपसले बेमुदत संपाचे हत्यार!

सुवर्ण भारत:किरण घाटे विशेष प्रतिनिधी

चंद्रपूर:शासन दरबारी प्रलंबित असलेल्या मागण्यांची अद्याप राज्य सरकारने दखल न घेतल्यामुळे नाईलाजाने राज्य महसूल कर्मचारी संघटनेने येत्या १५जूलै पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आज गुरुवारी चंद्रपूर जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे एक जबाबदार पदाधिकारी शैलेश धात्रक यांनी चंद्रपूर मुक्कामी दिली . दरम्यान होवून घातलेल्या या बेमुदत संपात चंद्रपूर जिल्हा कोतवाल संघटनेचे सर्व सदस्यगण सहभागी होत असल्याचे महसूल कर्मचारी नितिन पाटील यांनी सुवर्ण भारतच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
सदरहु संपामुळे शासनाच्या कामावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.सध्या लाडकी बहिण या योजनेची घोषणा झाल्यामुळे प्रत्येक तहसिल कार्यालयात जनतेची गर्दी वाढली असल्याचे चित्र दृष्टीक्षेपात पडत आहे.महसूल विभागात आजही बरीच पदे रिक्त आहेत.