Chandrapur city@ News
•चंद्रपूर जिल्ह्यात महसूल कर्मचा-यांच्या लेखनी बंद आंदोलनाला 💯 टक्के प्रतिसाद!
•शासनाच्या कामावर विपरीत परिणाम!
•जिल्हाधिकारी कार्यालयासह उपविभागीय कार्यालय व तहसिल कार्यालयात शुकशुकाट!
•प्रलंबित मागण्यांची शासनाने दखल न घेतल्यास सोमवार पासून बेमुदत संपावर जाण्याचा राज्य महसूल कर्मचारी संघटनेचा निर्धार !
सुवर्ण भारत:किरण घाटे, विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर:शासन दरबारी प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी आज शुक्रवार दि.12जूलैला चंद्रपूर जिल्ह्यातील महसूल कर्मचारी बांधवानी लेखनी बंद आंदोलन पुकारले या आंदोलनाला 100 टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा महसूल कर्मचारी संघटनेचे जबाबदार पदाधिकारी शैलेश धात्रक व अजय मॅकलवार यांनी केला आहे.दरम्यान आज सकाळी 11वाजता जिल्ह्यातील काही तहसिल कार्यालयास या प्रतिनिधीने भेट दिली असता कार्यालयात सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. तरी नेहमी प्रमाणे तहसिल कार्यालयात जनतेची गर्दी दृष्टीक्षेपात पडली .पण सदरहु लेखनी बंद आंदोलनामुळे त्यांना आल्या पावलीच घरी परत जावे लागले .एव्हढेच नाही तर शासनाच्या कामावर विपरित परिणाम झाला आहे.चिमूर येथील महसूल कर्मचारी लक्ष्मीकांत बनसुरे, वरो-यातील महसूल कर्मचारी संघटनेचे एक पदाधिकारी अमोल आखाडे व बल्हारपूर तहसिल कार्यालयाचे महसूल लिपिक दिपक वडूळे यांनी आजच्या या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे सुर्वण भारतच्या प्रतिनिधीला सांगितले. राज्य सरकारने त्यांच्या रास्त मागण्यांची अद्याप दखल न घेतल्यामुळे नाईलाजाने राज्य महसूल कर्मचारी संघटनेने येत्या १५जूलै पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती काल गुरुवारी चंद्रपूर जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे एक जबाबदार पदाधिकारी शैलेश धात्रक यांनी दिली . दरम्यान होवून घातलेल्या या बेमुदत संपात चंद्रपूर जिल्हा कोतवाल संघटनेचे सर्व सदस्यगण सहभागी होत असल्याचे महसूल कर्मचारी नितिन पाटील यांनी सुवर्ण भारतच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
सध्या लाडकी बहिण या योजनेची घोषणा झाल्यामुळे प्रत्येक तहसिल कार्यालयात जनतेची गर्दी वाढली असून महसूल विभागात आजही बरीच पदे रिक्त असल्याचे बोलल्या जाते.प्रत्येक वेळी शासन राज्य महसूल कर्मचारी संघटनेला आश्वासन देते पण त्या आश्वासनांची पूर्तता करीत नसल्यामुळे कर्मचारी वर्गांना बेमुदत संपाचे पाऊल उचलावे लागते . आजच्या या लेखनी बंद आंदोलनात महिला कर्मचाऱ्यांच्या सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला हे विशेष!


