Varora city@news
•अज्ञात चोरट्यांनी एक लाख 56 हजाराचा सोन्या-चांदीचा ऐवज केला लंपास
• नगद दोन हजार रुपये
•वनी बायपास मार्गावर कर्मवीर वार्डातील घटना
सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनीधी, वरोरा
वरोरा :शहरातील वनी बायपास मार्गावरील कर्मवीर वार्डातील उद्धव गेडाम यांच्या मालकीच्या असलेल्या घरात भाड्याने राहत असलेल्या राधिकासिंह देवडा यांच्या घरी कुणी नसल्याचा फायदा घे पहाटे घरात चे कुलूप तोडून आज प्रवेश करत सोन्या-चांदीचा ऐवज लंपास केल्याची घटना आज दिनांक 12 जुलै 2024 ला सकाळी 7 वाजता उघडकीस आली .
शहरातील कर्मवीर वॉर्डातील गेडाम यांच्या घरी भाड्याने राहत असलेल्या राधिकासिहं देवडा यांचे कुटुंब हे लग्नकार्यासाठी बाहेरगावी गेले होते आज सकाळी त्यांच्या पुतण्या घरी गेला असता दरम्यान चोरट्यानी संधी साधून घरात प्रवेश करून सोन्या चांदीचा एकूण अंदाजे एक लाख 54 हजार रुपयाचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली. यामध्ये रोख दोन हजार रुपये असें एकूण चोरांनी 1लाख 56हजार हजारावर चोरट्यानी डल्ला मारला.सदर घटना पहाटेचे सुमारास घडली.
सदर घटनेसमंधी तक्रार वरोरा पोलिसात करण्यात आली असून वरोरा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांचे मार्गदर्शनाखाली वरोरा पोलीस करीत आहे.
. यापूर्वी वरोरा शहरात अनेकदा घरफोड्या झाल्या आहेत. मात्र अद्याप चोरट्याचा शोध लागला नाही. आता वरोरा पोलीस स्टेशन ला रुजू झालेले पोलीस निरीक्षक चोरट्याच्या मुसक्या आवळतील काय? याकडे आता वरोरा वासियांचे लक्ष लागले आहे.


