Chandrapur city@News
• ना.सुधिर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त अखंड रामचरित्र मानस पठण
• जिल्ह्यात रुद्रनारायण तिवारी यांच्या तर्फे विविध कार्यक्रम आयोजित केले

सुवर्ण भारत: शंकर महाकाली ( संपादक)
चंद्रपूर : जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय मोर्चा जिल्हा चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष रुद्रनारायण तिवारी यांच्या वतीने दरवर्षी जिल्हाभरात अनेक ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
यावेळीही तिवारी यांच्या हस्ते बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील केसरी नंदन हनुमान मंदिरात २४ तास श्री.रामचरितमानस पठणाचे आयोजन करण्यात आले होते.
चंद्रपूर बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील केसरीनंदन हनुमान मंदिर, मोठे भांडार गेट येथे 29 जुलै रोजी सकाळी 8.30 ते 8.30 या वेळेत श्री रामचरित्र मानस पाठ कार्यक्रमाचे आयोजन करून ना.सुधीर मुनगंटीवार वाढदिवस साजरा करण्यात आला.
महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.आचार्य पंडित कृष्णा तिवारी यांनी पूजन केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपचे पदाधिकारी सरचिटणीस रामपाल सिंह, भाजप नेते मनोज पाल, सुभाष कासनगोटुवार,मनोज सिंघवी, विलास टेमुडे, कविंद्र ओझा, हनुमान काकडे आदी मान्यवरांच्या हस्ते पूजन करून करण्यात आले.
त्याचप्रमाणे चंद्रपूर शहरातील लालपेठ, अष्टभुजा, महाकाली, संजय नगर, बापट नगर, लखमापूर हनुमान मंदिर तसेच बल्लारपूर, राजुरा, आवरपूर, गडचादूर, शास्त्री, घुघूस, माजरी, वरोरा, दुर्गापूर आदी ठिकाणी भाविकांच्या दर्शनासाठी भक्तीभावाने दर्शन घेतले. श्री रामचरित्र मानस प्रेमी उत्तर भारतीय मोर्चा उत्साहाने सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.
