Home Breaking News Chandrapur city@ News • मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना- चंद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या...

Chandrapur city@ News • मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना- चंद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या समितीत अशासकीय सदस्य म्हणून छबूताई वैरागडे यांचा समावेश!

170

Chandrapur city@ News
• मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना- चंद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या समितीत अशासकीय सदस्य म्हणून छबूताई वैरागडे यांचा समावेश!

चंद्रपूर :किरण घाटे

राज्यातील महिलांचा आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” ही योजना शासनाने सुरू केलेली आहे.
दरम्यान विधानसभा क्षेत्रिय समिती दि.30 जूलै 2024 ला चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी गठीत केली असून या समितीत चंद्रपूर शहरातील छबूताई वैरागडे यांचा अशासकीय सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.
सदरहु नियुक्ती चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मान्यतेने करण्यात आली आहे.
छबूताई वैरागडे यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान मोलाचे असून त्यांनी चंद्रपूर मनपाचे या पूर्वी सभापती पद देखील भुषविले आहे.
सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या शहरातील उत्कृष्ट महिला मंचच्या त्या अध्यक्ष आहेत.उपरोक्त समितीत त्यांचा सदस्य म्हणून समावेश झाल्याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.