Home Breaking News Chandrapur dist@ News • मागण्यांची पूर्तता न झाल्यास गनिमी कावा आंदोलन करु...

Chandrapur dist@ News • मागण्यांची पूर्तता न झाल्यास गनिमी कावा आंदोलन करु – महेश हजारेंचा चंद्रपूर जिल्हा प्रशासनाला इशाराq

134

Chandrapur dist@ News
• मागण्यांची पूर्तता न झाल्यास गनिमी कावा आंदोलन करु – महेश हजारेंचा चंद्रपूर जिल्हा प्रशासनाला इशारा

चंद्रपूर :किरण घाटे

चंद्रपूर जिल्ह्याच्या कोरपना तालुक्यातील व चिमूर तालुक्यातील काही गावांतील समस्या व अडचणी संबंधात आज सोमवारी दुपारी रोखठोक प्रहार कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश हजारे यांनी एक लेखी निवेदन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात सादर केले.

औद्योगिक नगरी म्हणून चंद्रपूर जिल्ह्यात कोरपना तालुक्याची ओळख आहे.परंतु आजही काही भागात जनतेसाठी राष्ट्रीयीकृत बँका व सुविधायुक्त बसस्थानक नाही.त्यामुळे जनतेची गैरसोय होत असल्याचे दिसून येते.

या सोबतच चिमूर तालुक्यातील अनेक गावांत पांदन रस्त्यांची कामे रखडली आहेत. या सर्व मागण्यांची पूर्तता तातडीने न झाल्यास गनिमी कावा आंदोलन करण्याचा इशारा रोखठोक प्रहार कामगार संघटनेचे महेश हजारे यांनी प्रशासनाला दिला आहे.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करताना रोखठोक प्रहार कामगार संघटनेचे महेश हजारे, अफरोज अली ,अर्शद मेश्राम व दत्तात्रय समर्थ उपस्थित होते.