Home Breaking News Mul Taluka@ News • तालूका कृषी अधिकारी प्रशांत कसराळेंवर तातडीने कारवाई...

Mul Taluka@ News • तालूका कृषी अधिकारी प्रशांत कसराळेंवर तातडीने कारवाई करा-दत्तात्रय समर्थंची मागणी

320

Mul Taluka@ News

• तालूका कृषी अधिकारी प्रशांत कसराळेंवर तातडीने कारवाई करा-दत्तात्रय समर्थंची मागणी

चंद्रपूर :किरण घाटे

मूल पोलिस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेल्या कृषी अधिकारी प्रशांत कसराळे यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी परत एकदा 7ऑगस्टला चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या कडे राष्ट्रीय लोकहित सेवाचे जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांनी केली आहे.
या पूर्वी देखील समर्थ यांनी महसूल आयुक्त नागपूर यांच्या कडे याच प्रकरणाच्या अनुषंगाने सदरहु कृषी अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती.हे येथे विशेष उल्लेखनीय आहे.