Home Breaking News तालूका कृषी अधिकारी प्रशांत कसराळेंवर तातडीने कारवाई करा-दत्तात्रय समर्थंची मागणी • समर्थंचा...

तालूका कृषी अधिकारी प्रशांत कसराळेंवर तातडीने कारवाई करा-दत्तात्रय समर्थंची मागणी • समर्थंचा “या “मागणी संदर्भात सातत्याने पाठपुरावा सुरूच!

359

Mul taluka@News

•तालूका कृषी अधिकारी प्रशांत कसराळेंवर तातडीने कारवाई करा-दत्तात्रय समर्थंची मागणी
• समर्थंचा “या “मागणी संदर्भात सातत्याने पाठपुरावा सुरूच!

सुवर्ण भारत : किरण घाटे (उपसंपादक)

चंद्रपूर मूल पोलिस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेल्या कृषी अधिकारी प्रशांत कसराळे यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, नागपूर महसूल आयुक्त तसेच चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांच्या कडे राष्ट्रीय लोकहित सेवाचे जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांनी केली आहे.
या पूर्वी देखील समर्थ यांनी महसूल आयुक्त नागपूर यांच्या कडे याच प्रकरणाच्या अनुषंगाने सदरहु कृषी अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती.या मागणी बाबत समर्थ यांचा सातत्याने पाठपुरावा सुरूच आहे.हे विशेष!