Home Breaking News Varora taluka@ News •सेवा ग्रुप फाउंडेशनच्या सदस्य नोंदणी कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद:...

Varora taluka@ News •सेवा ग्रुप फाउंडेशनच्या सदस्य नोंदणी कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद: “आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी सदैव पाठीशी राहू:अध्यक्ष निखिल मांडवकर

18

Varora taluka@ News
•सेवा ग्रुप फाउंडेशनच्या सदस्य नोंदणी कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद: “आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी सदैव पाठीशी राहू” – अध्यक्ष निखिल मांडवकर

सुवर्ण भारत: खेंमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी, वरोरा

वरोरा: सेवा ग्रुप फाउंडेशनच्या सदस्य नोंदणी कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. द्वारका नगरी येथील हनुमान मंदिर सभागृहात 12 एप्रिल रोजी झालेल्या या कार्यक्रमात 141 युवकांची सदस्य नोंदणी करण्यात आली.

सेवा ग्रुप फाउंडेशन ही संघटना विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक, सामाजिक आणि न्यायविषयक समस्यांवर काम करते. अध्यक्ष निखिल मांडवकर यांनी मार्गदर्शन करत संघटनेच्या कार्यपद्धतींविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी फाउंडेशन सदैव तत्पर राहील आणि न्याय मिळवून देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहील, असे आश्वासन त्यांनी दिले.

कार्यक्रमात सचिव अनुप पावडे, उपाध्यक्ष मोनेश भोयर, रुपेश चिंचोलकर, तपू कुलसंगे, संतोष पाझारे, पंकज पेचे, रोशन भट्ट, कुणाल वाटेकर, सतिश बावणे, दिनेश ढोक, आशिष दातारकर ,शैलेश परचाके, गणराज मांडवकर,आकाश खीरटकर,विवेक नन्नावरे,साहिल मडावी , जय चिकटे ,हर्षल पावडे ,धीरज उडकुळे ,नयन साळवे, रितेश नन्नावरे ,कुणाल जीवतोड ,जय चिकटे,हर्षल पावडे,मुकेश पावडे,सागर बोडे ,हर्षबोधी दारुंडे ,रिजवान शेख,विशाल गेडाम ,यशवंत दाहुले ,नरेंद्र खडतकर ,कुशल डोय व इतर सदस्य उपस्थित होते सेवा ग्रुप फाउंडेशनची स्थापना 22 ऑगस्ट 2019 रोजी झाली असून, संघटनेने रक्तदान शिबिरे, अन्नवाटप, कोरोना काळात मदतकार्य, आणि शैक्षणिक मदतीसह अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत.