Home Breaking News Korpna taluka@ News • ग्लोबल माउंट स्कूल कोरपना येथे स्वातंत्र दिन साजरा.

Korpna taluka@ News • ग्लोबल माउंट स्कूल कोरपना येथे स्वातंत्र दिन साजरा.

307

Korpna taluka@ News
• ग्लोबल माउंट स्कूल कोरपना येथे स्वातंत्र दिन साजरा.

सुवर्ण भारत:मंगेश तिखट
प्रतिनिधी, चंद्रपूर

कोरपना तालुक्यातील ग्लोबल माउंट स्कूल कोरपना येथे आज देशाचा स्वातंत्र दिवस, दरवर्षी प्रमाणे साजरा करण्यात आला. नृत्य, गाणी व बालकांनी दिलेली भाषणे उत्कृष होती. भारत देशाला स्वातंत्र मिळाले त्या दिवसा पासून प्रत्येक देश वासी स्वातंत्र्य दिन निमित्याने स्वातंत्र्य सैनिकाच्या बलिदानाचे आणि देश भक्ती स्मरण जाते.
संपूर्ण देश तिरंगाच्या रंगात रंगलेला दिसतो,घरा घरात, शाळा महाविद्यालय व सरकारी खाजगी कार्यालय मध्ये स्वातंत्र्य साजरा केला जातो.
ग्लोबल माउंट स्कूल मध्ये ध्वजारोहण कार्यक्रम कोरपना पोलीस स्टेशन मधील प्रकाश राठोड मेजर यांनी केला. या ठिकाणी उपस्थित कार्यक्रमाचे, अध्यक्ष प्रकाश राठोड AIS कोरपना पोलीस स्टेशन. शाळेचे अध्यक्ष नितीन कासाडीवर , शिक्षक वृंद- अविनाश बहरे, रुपाली रेगुंडवार, स्वेता भुडे, कल्पना करिये, मनीषा येमुलवार , सविता मोहूर्ले , सिमरन शेख, करिश्मा पेटकर, पल्लवी पिंपळकर, पूनम डाखरे , मंगेश तिखट,सूरज वेलादी, प्रणय ठाकरे, विदयार्थी व कर्मचारी उपस्थित होते