Home Breaking News • जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते रुग्णवाहीकेचा लोकार्पण सोहळा

• जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते रुग्णवाहीकेचा लोकार्पण सोहळा

85

• जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते रुग्णवाहीकेचा लोकार्पण सोहळा

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर

घुग्घुस: लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड व लॉयड्स इन्फिनिट फॉउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने सामाजिक दायित्व विभागांतर्गत आरोग्य क्षेत्रात,शेतीविषक उपक्रम शैक्षणिक,महिला बचत गट उपक्रम असे वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहे ,याच माध्यमातून सामाजिक दायित्व विभागांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय अत्याधुनिक रुग्णवाहिका लोकार्पण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे गरजू नागरिकांना मोफत अत्याधुनिक रुग्णवाहीकाचा उपयोग व्हावा,रुग्णवाहिकाचे फित कापून आणि हिरवी झेंडी दाखवून जिल्हाधिकारी विनय गौडा चंद्रपूर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित म्हणून लॉयड्स मेटल्स चे युनिट हेड वाय.जी.एस. प्रसाद,महादेव चिंचोळे जिल्हा शल्य चिकित्सक चंद्रपूर,उपाध्यक्ष पवन मेश्राम,तरुण केशवाणी,नम्रपाली गोंडाने,अरविंद चौधरी,अनुराग मत्ते उपस्थित होते.