Home Breaking News Ballarpur City News • बल्लारपुर पोलिसाची कारवाई शहरात तलवार पकडली

Ballarpur City News • बल्लारपुर पोलिसाची कारवाई शहरात तलवार पकडली

202

Ballarpur City News
• बल्लारपुर पोलिसाची कारवाई शहरात तलवार पकडली

सुवर्ण भारत: शंकर महाकाली(संपादक)

बल्लारपूर: बल्लारपुर पोलीसांनी दिनांक-३१/०८/२०२४ रोजी आगामी सण उत्सवादरम्यान रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करणे कामी पेट्रोलींग करित असतांना मुखबिरच्या खबरेवरुन किल्ला वार्ड बल्लारपुर येथील झाडीझुडपी परिसरात आरोपी नामे-१) गौरव सुनिल कुकुडकर वय-१८ वर्षे रा. किल्ला वार्ड बल्लारपुर जि. चंद्रपुर याने लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचे उदेदेशाने लोखंडी तलवार बाळगुण लपवुन ठेवल्याची माहिती मिळाल्यावरुन सदर ठिकाणी जावुन आरोपीस ताब्यात घेवुन त्याचेकडुन लोखंडी तलवार जप्त करुन पोलीस ठाणे गुन्हा रजि.क्रं.८४३/२०२४ कलम-४,२५ भारतीय हत्यार कायदयान्वये कारवाई करण्यात आली.

कारवाई पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु ,जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचांदुर अतिरिक्त कार्यभार राजुरा यांचे मार्गदर्शनात सुनिल गाडे पोलीस निरीक्षक, सफौ. गजानन डोहीफोडे, पोहवा. रणविजय ठाकुर, सुनिल कामटकर, सत्यवान कोटनाके, संतोष दंडेवार पोअं. श्रिनिवास वाभिटकर, विकास जुमनाके, लखन चव्हाण, खंडेराव माने, वशिष्ट रंगारी, शेखर माथनकर कार्यवाही यांनी केली आहे.