Home Breaking News जि आर आय एल कंपनीचे निकृष्ठ रपटा गेला वाहून रस्ता बंद शेतकऱ्याचे...

जि आर आय एल कंपनीचे निकृष्ठ रपटा गेला वाहून रस्ता बंद शेतकऱ्याचे हाल ?

12

जि आर आय एल कंपनीचे निकृष्ठ रपटा गेला वाहून रस्ता बंद शेतकऱ्याचे हाल ?

सुवर्ण भारत:मनोज गोरे
प्रतिनिधी, चंद्रपूर

कोरपना : राष्ट्रीय राजमार्ग 353 बि याकरिता देवघाट नाला14 किलोमीटर पोखरून रेती दगड मुरूम वाळू गेले दोन वर्ष रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात आले संपूर्ण नाल्यातील पाषाण उघडे पडले तर अनेक ठिकाणी खोल खड्डे झाल्यामुळे शेतकऱ्याच्या शेतात जाणं कठीण झालं नाला उत्खनन करत असताना कुसळ येथे धातुर्मातुर तात्पुरता पाईप टाकून रपटा तयार करण्यात आला.

होतामात्र दिनांक तीन ला पकडीगडम पान लोटात रात्र झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे धरणाला विसर्ग होऊन पुराच्या पाण्याने पूर्ण नाला धुवून साफ केला मात्र कंपनीने एक वर्षांपूर्वी बांधलेला रट्टा खसुन पडला असून कुसळ येथील शेतकऱ्यांना शेतात जाणे कठीण झाले आहे जीआरएल कंपनीने तातडीने रस्त्याची व्यवस्था करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे