Home Breaking News शेंबळ येथे श्रीमद भागवत सप्ताह सुरु आमदार करण देवतळे यांचा सत्कार

शेंबळ येथे श्रीमद भागवत सप्ताह सुरु आमदार करण देवतळे यांचा सत्कार

77

शेंबळ येथे श्रीमद भागवत सप्ताह सुरु
आमदार करण देवतळे यांचा सत्कार

सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर

तालुका प्रतिनिधी,वरोरा

वरोरा:दिनांक. 22 जानेवारी ते 29 जानेवारी 2025 दरम्यान परमपूज्य श्री कृष्णकुमार पांडेजी महाराज यांचे भागवताचार्य सुरु असून संपूर्ण गावात धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी दिनांक २७ जानेवारी रोजी गावकऱ्यांकडून नवनिर्वाचित आमदार करण देवतळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला, त्यावेळी गावाकऱ्यांचे आमदार देवतळे यांनी आभार मानले व शेंबळ – थोराना रस्ता व शेंबळ ते करंजी रस्ता हे दोन्ही रस्ते स्वर्गीय मंत्री संजयबाबू देवतळे यांचे काळातील असून मागील चार – पाच वर्षापासून या रस्त्यावरून ये – जा करने शेतकऱ्यांना अतिशय कठीण होऊन बसले आहे ह्याची जाणीव मला आहे असे आपल्या भाषणातून सांगून निश्चित हे दोन्ही रोड पुर्ण करणार असे आश्वासन दिले. यावेळी परमपूज्य श्री कृष्णकुमार पांडेजी महाराज यांचे आमदार देवतळे यांनी स्वागत करून त्यांचा आशीर्वाद घेतला. यावेळी विशेष उपस्थितीत कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक बाळूभाऊ भोयर, बालाजी पाटील जिवतोडे ( सरपंच) ज्योतीताई मेश्राम ( उपसरपंच) महादेव पाटील जिवतोडे,दिगांबर पाटील खापने ( माजीसैनिक) प्रफुल्ल पाटील उमरे ( पोलीस पाटील),महादेव पाटील घागी,अरूणभाऊ खारकर,प्रविण जिवतोडे,
लक्ष्मणराव मोहीतकार, झामराज दरवे,
विठ्ठल पाटील चोपने, रमेश आसूटकार,मनोज घागी
शालिकजी मेश्राम, प्रदिप पाटील मत्ते तसेच ग्राम पंचायतीचे पदाधिकारी त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने उपस्थित गावातील महिला व पुरुष यांची होती.