Home Breaking News • स्टेला म्येरीस शाळेत गणराज्य दिवस उत्साहात साजरा.. • कारगील युद्धातले रिटायर्ड...

• स्टेला म्येरीस शाळेत गणराज्य दिवस उत्साहात साजरा.. • कारगील युद्धातले रिटायर्ड अधिकारी यांची विशेष उपस्थिती.

362

• स्टेला म्येरीस शाळेत गणराज्य दिवस उत्साहात साजरा..
• कारगील युद्धातले रिटायर्ड अधिकारी यांची विशेष उपस्थिती.

सुवर्ण भारत: विशाल डुंबेरे,प्रतिनीधी चंद्रपूर

राजुरा : 26 जाने. ला अनेक शाळामध्ये गणराज्य दिवस साजरा केला जातो. राजुरा येथील स्टेला म्येरीस शाळेत विविधनंगी कार्यक्रम आयोजित केला गेला. प्रमुख पाहुणे म्हणून. रिटायर्ड मिलिटरी अधिकारी (सुभेदार) श्री. शंकरराव माईंगरे आणि सिस्टर जॉयल, सिस्टर ग्रेस मारिया उपस्थित होते. सर्वप्रथम सकाळी 7.वाजता ध्वजरोहन करण्यात आले. त्यानंतर सामूहिक राष्ट्रगीत गाऊन राष्ट्र ध्वजला सलामी देण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना नृत्यने करण्यात आली.माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते शोर्य पदक प्राप्त केलेले रिटायर्ड मिलिटरी अधिकारी श्री माईंगरे यांचे मार्गदर्शन भाषण
संपन्न झाले. ज्यांनी कारगील युद्धात स्वतः गोळी झेलली. परंतु सौभाग्याने ते बचावले.लगेच विद्यार्थ्यांनी डम्बल्स, पिऱ्यामिड, नृत्य सादर केले. सोबतच देशभक्ती गीतांवर विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट नृत्य सादर करून मंत्रमुग्द केले. शाळेच्या क्रीडा मैदानावर अनेक खेळ विद्यार्थ्यांनी खेळले.उत्साह पूर्ण गणराज्य दिवस साजरा कारण्याकरिता शाळेतील सर्वच शिक्षक वृंदानी अथक परिश्रम केले.