• वडवणी येथील तिरुपती प्रायमरी इंग्लिश स्कूल मध्ये माता / पालक मेळावा व खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न•
•होम मिनिस्टरच्या मानकरी ठरल्या रचना जाधव, शिल्पा कवचट,वैष्णवी नरवडे—
सुवर्ण भारत:गोरख मोरे
बीड जिल्हा प्रतिनिधी
मकर संक्रांतीचे हळदी कुंकूवानिमित्त माता /पालक मेळावा व खेळ पैठणीचा होम मिनिस्टरचा कार्यक्रमाचे आयोजन वडवणी येथील,तिरुपती प्रायमरी इंग्लिश स्कूल मध्ये करण्यात आले होते .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. सुनिता खांडेकर तर उद्घाटक म्हणून महिला पत्रकार सौ.गितांजली लव्हाळे मॅडम व प्रमुख पाहुण्या सौ.रचनाताई नहार,इंग्लिश स्कूलच्या संस्थेच्या संचालिका सौ.उषाताई मुंडे,इंग्लिश स्कूलचे संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत सोळंके, संचालक बंडोजी खांडेकर,इंग्लिश स्कूलचे प्राचार्य प्रा.गणेश सोळंके आदींजन मान्यवर म्हणून उपस्थित होते .
महिला पत्रकार सौ.गितांजली लव्हाळे मॅडम यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले असून , महापुरुषांच्या वेशभूषा इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थ्यांनी सादर केल्या , त्यामध्ये जिजामाता यांची वेशभूषा कु.स्वरा सोळंके तर झाशीची राणी कु.सानिका आळणे,महात्मा गांधी चि.समर्थ मदने,लोकमान्य टिळक चि.विराज शिंदे,भगतसिंग समर्थ घुमरे,सुभाष चंद्र बोस चि.आकाश चोरमले,महात्मा ज्योतिबा फुले चि.सौरभ गार्डी,सावित्रीबाई फुले चि.स्वरा चोरमले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चि.साई कवचट छत्रपती शिवाजी महाराज चि.ऋतुराज वरकड यांनी केल्या होत्या .
महिला पत्रकार गितांजली लव्हाळे मॅडम माता/ पालक मेळाव्यास बोलताना सांगितले की, आपली मुलं अभ्यास कसे करतात , आपण स्वतःही मोबाईलचा वापर कमी प्रमाणात करावा , मुलांचा अभ्यास घ्यावा , त्यांच्यावर संस्कार करावेत असे या प्रसंगी सागितले .
पुढे सौ.रचनाताई नहार यांनी सांगितले की,महिलांनी आनंदी हॅपेनिस व उत्साही असावे असे आपले मनोगत त्यांनी व्यक्त करताना सांगितले .
खेळ पैठणीचा होम मिनिस्टर च्या कार्यक्रमाला सुरुवात झाली , या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा सोळंके / शरद चव्हाण यांनी केले . या मध्ये सौ.रचना जाधव यांनी प्रथम क्रमांक पटकावला त्या पैठणी साडीच्या मानकरी ठरल्या तर , सौ.शिल्पा कवचट यांचा द्वितीय क्रमांक आला असून , त्यांना चांदीची तिरुपतीची प्रतिमा देण्यात आली तर , सौ.वैष्णवी नरवडे ह्या चांदीची वाटी व चमच्याच्या मानकरी ठरल्या .
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.गणेश सोळंके यांनी केले तर , सूत्रसंचालन सौ.बागडे मॅडम यांनी केले या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने माता /पालक व इंग्लिश स्कूलचे शिक्षक,विद्यार्थी उपस्थित होते .
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंग्लिश स्कूल मधील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले .