आष्टी तालुक्यातील मौजे धानोरा येथे आमदार सुरेश(अण्णा )धस यांच्या वाढदिवसा निमित्त भव्य दंतचिकित्सा /नेत्र तपासणी शिबिर संपन्न—
सुवर्ण भारत: गोरख मोरे
बीड जिल्हा, प्रतिनिधी
बीड:आष्टी तालुक्यातील मौजे धानोरा येथे १ फेब्रुवारी रोजी आमदार सुरेश (आण्णा )धस यांच्या वाढदिवसा निमित्त सांस्कृतिक सभागृह धानोरा येथे युवा नेते जयदत्त (भाऊ) धस यांच्या उपस्थितीत शुभ हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले .
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार .साहेबरावजी दरेकर नाना उपस्थित होते . या प्रसंगी धानोरा सह परिसरातील ५०० गरजू रुग्ण उपस्थित राहून लाभ घेतला .
अहिल्यानगर येथील नेत्रतज्ञ डॉ.प्रकाश रसाळ, डॉ.सागर शिंदे (हिरडी व दंतरोपण तज्ञ), डॉक्टर मयुरी शिंदे ( कॉस्मेटोलॉजिस्ट, केशर रोपन तज्ञ ), पुणे येथील दंतचिकित्सक डॉ.स्नेहल बोलभट/थोरवे यांनी मार्गदर्शन तसेच ५०० रुग्ण(दंत चिकित्सा व नेत्र तपासणी )व ३०० शाळेतील मुलांची दंत चिकित्सा केली . या प्रसंगी पं.स.सदस्य परमेश्वर काका शेळके,माजी सभापती अंकुशराव चव्हाण,माजी सरपंच राजाभाऊ शेळके, अशोक लगड, बीड जिल्हा जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा सुवर्णाताई गिऱ्हे मॅडम, सय्यद बबलू ,शिवसेना तालुकाप्रमुख कुमार शेळके, जनता विद्यालयाचे सचिव विशाल बांदल, सुनील तरटे सर, गिऱ्हे सर, कुमार टकले (आबा) , जय चाणोदया,इंजि.रमेश जी ढोबळे,इंजि.आदी जन या प्रसंगी उपस्थित होते .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते शिरीष (भाऊ ) थोरवे, इंजि.शैलेश थोरवे, शिवाजी थोरवे, आजिनाथ शेळके, अहिल्यानगर येथील सर्व नेत्र चिकित्सा टीम, दंतचिकित्सक सर्व टीम यांनी कमालीचे कष्ट घेऊन सर्व रुग्णावर योग्य ते औषध ,उपचार मोफत करण्यात आले .या शिबिरास सर्वानी भरपूर प्रतिसाद दिला.