• आष्टी येथील फार्मसी कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्यू व एकदिवशीय कार्यशाळा संपन्न–
सुवर्ण भारत : गोरख मोरे
बीड जिल्हा प्रतिनिधी
आष्टी येथील आनंद चॅरिटेबल संस्था संचलित कॉलेज ऑफ फार्मासुटिकल सायन्स अँड रिसर्च आष्टी (डी फार्मसी ,बी फार्मसी, एम फार्मसी) या कॉलेजमध्ये एक दिवशीय कार्यशाळा व कॅम्पस इंटरव्यू (रोजगार मेळावा) संपन्न झाला . या एकदिवशीय कार्यशाळेमध्ये औषधनिर्माण शास्त्र क्षेत्रामधील विविध पदावर कार्यरत राहिलेले, असलेले तज्ज्ञांनी या कॉलेजमधील डी फार्मसी, बी फार्मसी व एम फार्मसी मधील सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . या तज्ञांमध्ये श्री राजेंद्र पडाळकर (मार्केटिंग हेड मॅग्नम ग्रुप ऑफ हॉस्पिटल, माजी मार्केटिंग हेड युनिकेम, रँनबॅक्सी, सिन्सान औषधनिर्माण इंडस्ट्री) व श्रीमती. प्रीती मेहता (जनरल मॅनेजर ईट्रल लाइफ सायन्स, माजी झोनल बिजनेस मॅनेजर सींनसान फार्मासुटिकल, मॅनेजर रोल लुपिन फार्मासुटिकल मुंबई ) हे होते . या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना पुढील विषयावर मार्गदर्शन केले असून , औषध निर्माण कंपनीमधील विविध विभागची माहिती दिली, औषधनिर्माण कंपनीमधील वेगवेगळे विभाग कशा पद्धतीने चालतात, औषधनिर्माण कंपनीमध्ये असलेले विभाग मधील पदावर कशा पद्धतीने रोजगार मिळवता येतो, औषधी कंपनीमध्ये विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना कशा प्रकारचे रोजगार उपलब्ध आहेत , आज देशांमधील औषधनिर्माण क्षेत्रामध्ये काय काय बदल झाले आहेत, औषध निर्माण कंपनी मधील मार्केटिंग क्षेत्रात रोजगार मिळवण्यासाठी विद्यार्थ्यां कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे , विद्यार्थ्यांनी औषध निर्माण कंपनीमध्ये रोजगार मिळवण्यासाठी कशा पद्धतीने मुलाखत घेतली जाते त्या मुलाखतीसाठी कशा पद्धतीने तयार केली पाहिजे, विद्यार्थी व विद्यार्थिनींमध्ये असलेली मुलाखतीची भीती , भीती कशा पद्धतीने दूर केली पाहिजे अशा वेगवेगळ्या विषयावर विद्यार्थ्यांना या तज्ञांनी मार्गदर्शन केले . तसेच या दिवशी कॅम्पस इंटरव्यू मार्फत औषधनिर्माण कंपनीमधील मार्केटिंग क्षेत्रामध्ये मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह या पदावर विद्यार्थ्यांची निवड केली. निवड झालेल्या या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय भीमरावजी धोंडे साहेब, डॉ.अजयदादा धोंडे सहसचिव, श्री अभयराजे धोंडे संचालक , सर्व प्रशासकीय अधिकारी डॉ. डी बी राऊत , शिवदास विधाते, माऊली बोडखे, संजय शेंडे या सर्वांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
या कार्यक्रमाचे आयोजन कॉलेजमधील ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल अधिकारी श्री अभिमान कोपनर (सहप्राध्यापक), श्री अभिलाष वाघमारे (सहप्राध्यापक) यांनी केले होते .या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू असताना व शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना औषधनिर्माण क्षेत्रामध्ये नाविन्य बाबीबाबत नेहमीच मार्गदर्शन केले जाते तसेच यापुढे ही अशा प्रकारच्या एकदिवसीय कार्यशाळा व कॅम्पस इंटरव्यूचे आयोजन केले जाईल असे कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुनील कोल्हे यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले .