दि.१ फेब्रुवारी २०२५ रोजी पीएम श्री जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, टाकळसिंग, तालुका आष्टी, जिल्हा बीड येथे चालू असलेल्या शिक्षण महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते , या शिबिराचे उद्घाटन डॉक्टर विलास सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले असून , कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महेश कुमार शिंदे (मुख्याध्यापक) होते . कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. महेश नाथ (दंत चिकित्सक, कडा) आणि डॉ. किरण कवडे (नेत्ररोग तज्ञ, आनंद ऋषी हॉस्पिटल, अहमदनगर) यांनी सहभाग घेतला . प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बेग (प्राथमिक आरोग्य केंद्र, टाकळसिंग), डॉ चंद्रकांत चौधरी, आणि डॉ सुनील पठाडे यांची उपस्थिती होती . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीराम जगताप सर आणि प्रवीण कुमार सिद्धेश्वर सर यांनी केले असून , उद्घाटक डॉ विलास सोनवणे यांनी त्यांच्या शालेय जीवनातील अनुभव कथन करताना प्राथमिक शिक्षणाचे महत्त्व आणि त्याची भविष्यातील करिअरवर होणारी सकारात्मक प्रभाव पटवून सांगितली . त्यांनी जिल्हा परिषद शाळा, टाकळसिंगच्या गुणवत्तेबद्दलही गौरवोद्गार काढले . प्रमुख मार्गदर्शक डॉ महेश नाथ यांनी लहान वयातच मौखिक आरोग्य कसे राखावे यावर सखोल चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले . त्यांनी ५०० हून अधिक विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी आणि उपचार केले असून , आवश्यक असलेल्या मोठ्या उपचारांसाठी त्यांच्या क्लिनिकमध्ये सवलतीत उपचार उपलब्ध करून देणार असल्याचे जाहीर केले . महेश कुमार शिंदे यांनी शाळेच्या गुणवत्तावाढीबाबत केलेले प्रयत्न आणि यशस्वी उपक्रमांविषयी माहिती दिली असून , त्यांनी पीएम श्री जिल्ह्यातील २२ उत्तम शाळांमध्ये शाळेचा समावेश झाल्याचे सांगितले . नगरवरून आलेल्या आदर्श टीमने सर्व विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी करून त्यासंबंधी योग्य सल्ला दिला . कार्यक्रमाने विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक जागरूकतेसाठी मोलाचे योगदान दिले