Home Breaking News शिदोड येथील जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न ...

शिदोड येथील जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाचे कौशल्य बाल आनंद मेळाव्यातून मिळते— जेष्ठ विस्तार अधिकारी माटे

69

• शिदोड येथील जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

• विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाचे कौशल्य बाल आनंद मेळाव्यातून मिळते— जेष्ठ विस्तार अधिकारी माटे सर

सुवर्ण भारत :गोरख मोरे
बीड जिल्हा, प्रतिनिधी

शालेय विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान, नफा- तोटा, फायदा- नुकसान व हिशोबांचा ताळमेळ हे सर्व कौशल्य बाल आनंद
मेळाव्यातून शिकण्यास मिळते त्यामुळे शालेय जीवनात बाल आनंद मेळावा हा विद्यार्थी जीवनात व्यवहार ज्ञान रुजवणारा व सक्षम विद्यार्थी बनविणारा प्रमुख भाग असल्याचे मत
गशिअ कार्यालय बीड येथील ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी माटे साहेब यांनी शिदोड येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित करण्यात आलेल्या बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले .
या प्रसंगी व्यासपीठावर कुर्ला केंद्राचे केंद्रप्रमुख कांबळे सर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा प्रतिक्षा प्रविण तोडकर, सरपंच जयलिंग तोडकर, गावातील ज्येष्ठ नागरिक चंद्रसेन शेंडगे नाना, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पवार सर, महालक्ष्मी विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रय चव्हाण सर, आत्माराम वाव्हळ सर, गणेश गुजर सर, कुर्ला केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक गायकवाड सर, कुर्ला केंद्रातील शिक्षक रणे सर, पवळ सर आठवले सर, प्रल्हाद गिरी सर, गिरी सर, टेकाळे मॅडम, बागडे मॅडम, कुलकर्णी मॅडम कांबळे मॅडम,जोशी मॅडम, मस्के मॅडम, करांडे मॅडम व शिदोड शाळेतील मुख्याध्यापक पवार सर, तसेच शिक्षक अनवणे सर, घोडके सर,चिल्लेवाड सर, शिक्षिका गोरे मॅडम, भागडे मॅडम, नवसारे मॅडम, मस्के मॅडम आदी उपस्थित होते .
या बाबत अधिक माहिती अशी की , शाळेतील विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाचे कौशल्य माहित व्हावे व त्यांचा विकास व्हावा यासाठी प्रत्यक्ष व्यवहार कसा करावा याचे प्रात्यक्षिक देण्याच्या उद्देशाने बीड तालुक्यातील शिदोड येथील जिल्हा परिषद शाळेत शनिवार दिनांक १ फेब्रुवारी, २०२५ रोजी
निपुण भारत अंतर्गत, शाळेमध्ये माता -पालक बैठक, हळदी कुंकू आणि बाल -आनंद मेळावा (आनंदनगरी ) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
या मेळाव्याचे उद्घाटन जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी माटे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले असून ,आलेल्या सर्व उपस्थित मान्यवरांचे या प्रसंगी स्वागत करण्यात आले . स्वागतानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विस्तार अधिकारी माटे सर यांनी सांगितले की, शाळा हे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण शिक्षण देणारं केंद्र असुन , आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच तत्पर असतात. सर्व शाळेत शालेय अध्यापना बरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सहशालेय उपक्रमांचे आयोजन केले जात आहेत. विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान मिळावे यासाठी आज शनिवार दिनांक १ फेब्रुवारी रोजी आपल्या शिदोड जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा (आनंदनगरी ) आयोजित करून प्रत्यक्षात व्यवहार कसा करावा, बाजारात आपला माल कसा विकावा याचा प्रत्यक्षात अनुभव या विद्यार्थ्यांना मिळणार आहे . हा अनुभव त्यांच्या भावी जीवनात शिदोरी म्हणून कायम सोबत राहणार आहे . या मेळाव्यातून विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान, नफा- तोटा, फायदा- नुकसान व हिशोबांचा ताळमेळ हे सर्व कौशल्य शिकण्यास मिळते , त्यामुळे अशा मेळाव्याचे प्रत्येक शाळेत आयोजन केले पाहिजे असे मत या प्रसंगी माटे सर यांनी व्यक्त केले . शिवाय सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले .
या बाल आनंद मेळाव्यात
या मेळाव्यात पहिली ते सातवीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी भाग घेतला होता . विद्यार्थ्यांनी आपले पारंपारिक खाद्यपदार्थ आणले होते . शिवाय दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तूं विक्रीसाठी आणल्या होत्या. या मध्ये प्रामुख्याने सर्व मुला मुलींनी विविध खाण्याचे स्टॉल लावलेले होते . स्टॉलमध्ये मिसळ पाव, वडापाव, भेळ, मिसळपाव, पाणीपुरी, पॅटीस, लिंबू सरबत, कलिंगड, मंचुरियन, भाजी भाकरी, दही-धपाटे इत्यादी स्टॉल लावलेले होते . यामध्ये मुलांच्या चेहऱ्यावर हसू व आनंद दिसून आला . या आनंदमेळातून मुले व्यवहारिक ज्ञान, आनंद, गणितीय क्रिया, सहकार्य, एकमेकांना मदत, अशा निराळ्या प्रकारच्या बाबीची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली .
आपण आणलेला माल लवकरात लवकर विकला जावा यासाठी मेळाव्यात स्टॉल लावलेले विद्यार्थी बाजारातील व्यापाऱ्या प्रमाणे मोठ्याने आवाज देऊन विद्यार्थी ग्राहकांना आपल्या स्टॉलकडे आकर्षित करत होते . या ठिकाणी होणारा आवाजाचा गलका पाहून आज शाळेत बाजार भरला की काय असे भासत होते . मेळावा यशस्वी करण्यासाठी शाळेचे सहशिक्षक विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले