Home Breaking News #chandrapur लॉयड्स मेटल्स कंपनीच्या परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहिम...

#chandrapur लॉयड्स मेटल्स कंपनीच्या परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहिम • १० फेब्रुवारी पासून ते २३ फेब्रुवारीपर्यंत हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिम #loyydasmetal

209

#chandrapur लॉयड्स मेटल्स कंपनीच्या परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहिम

• १० फेब्रुवारी पासून ते २३ फेब्रुवारीपर्यंत हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिम
#loyydasmetal

सुवर्ण भारत: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर

घुग्घुस : लाइट्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड तथा प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विधमाने हत्तीरोग सार्वत्रिक औषधी दुचाकी परिसरा समोर शेकडोच्या वर कर्मचार्यांना हत्तीरोगाची बिमारी भविष्यात नाहो त्याकरिता हत्तीरोगाची गोळ्या खाऊ घालविण्यात आले.

घुग्घुस येथील परिसरातील गावा-गावात प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका तसेच आशा वर्करच्या माध्यमातून हत्तीरोग ना हो त्यासाठी घरोघरी जावुन गोळ्या खाऊ घालण्यात येत आहे.

मार्गदर्शक सुचनानुसार राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत हत्तीरोगाचे दुरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहिम घुग्घुस शहरात दिनांक १० फेब्रुवारी ते दिनांक २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत राबविण्यात येत आहे. सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेअंतर्गत राज्यातील हत्तीरोगासाठी संवेदनशील असलेल्या डी.ई.सी. व अल्बेंडाझोल गोळया सोबतच आयव्हरमेक्टीनची तिसरी मात्रा गरोदर माता, ५ वर्षा खालील बालके व गंभिर आजारी रुग्ण वगळून देण्यात येणार आहे. वरील औषधांचे सेवन केल्याने हत्तीरोगाचे जंतू नष्ट होतात.ही औषधी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समक्ष खाणे आवश्यक आहे.

तसेच अतिरिक्त माहितीसाठी आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात येथे सांधावा अशी माहिती दूरध्वनी वरुन प्राथमिक आरोग्य केंद्राचे ड्रॉ. निलेश पडगीलवार यांनी महासागर प्रतिनिधीला कळविण्यात आले.

याप्रसंगी प्राथमिक आरोग्य सेवक डी.डी. गणविर,अमृत गायकवाड, सत्यप्रकाश पावडे व कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.