#Jivti
• शासकीय आश्रमशाळा पाटण येथे प्रकल्प अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पालक सभेचे आयोजन व गुणवंतांचा सत्कार
सुवर्ण भारत:चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण.
जिवती : पाटण येथील शासकीय आश्रमशाळेत 30 मे रोजी प्रकल्प अधिकारी श्री विकास राचेलवार यांच्या विशेष उपास्थितीत पालक मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी प्रकल्प अधिकारी यांनी शाळेने उन्हाळी शिबिराच्या केलेल्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापकाचे कौतुक केले सोबतच विविध नविन्यपुर्न् उपक्रमाने परिसरात वेगळी ओळख निर्माणकेलेल्या पाटण आश्रम शाळेचे त्यांनी कौतुक करताना शाळेतील विविध भौतिक सोयी सुविधा विद्यार्थी प्रगती याविषयी सविस्तर चर्चा केली.
शाळेतील इयत्ता दहावीचे गुणवंत विद्यार्थिनी कु. पुजा बळीराम बुरकुले, राणी मारोती कोठुळे, कु. अंजना शामराव आत्राम,कु. काजल शामराव सिडाम ,कु. श्रिषा शामराव कुळसंगे, तसेच गुणवंत विद्यार्थी निलेश सोमू कोटनाके, परशुराम भीमराव कोवे , रमेश ज्ञानेश्वर कोठुळे , विजय आनंदराव आत्राम , दिनेश भिमराव आत्राम यांचा भेटवस्तु देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी योग्य क्षेत्राची निवड करताना शिक्षकांनीच मार्गदर्शकाची व पालकाची भूमिका बजावण्याचे आव्हान प्रकल्प अधिकारी यांनी केले.तसेच विद्यार्थ्यांनी अपयशाने खचून न जाता सदैव प्रयत्नवादी राहण्याचा सल्ला दिला.जीवनात यशस्वी होण्याकरिता शिक्षणाबरोबरच शिलही तेवढेच महत्वाचे हे विविध उदाहरणांद्वारे पटवून दिले.या प्रसंगी पालकांचा देखील सत्कार करण्यात आला.
मुलींच्या नवीन वसतिगृह इमारती बरोबरच नव्याने मुलांचे वसतिगृह व कर्मचारी निवास्थाने निर्माण करून शाळेच्या भौतिक सुविधाचा पाया अधिकच मजबूत करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असल्याचे प्रकल्प अधिकारी यांनी सांगितले. शाळेचे मुख्याध्यापक वासुदेव राजपुरोहित यांनी प्रस्ताविक करताना या सत्रातील शाळेची उद्दीस्टे विद्यार्थी भरती लक्षांक आणी शाळेच्या सोयी सुविधाबाबत माहिती दिली.
पालक मारोती कोठुळे यांनी शाळेची गुणवत्ता आणी इतर सोयीसुविधा बाबत कौतुक करताना पाटण शाळा ही सभोवताल् च्या विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक विकासाचे व नांविण्यापूर्ण उपक्रमाचे केंद्र असल्याचे सांगून पुढील वाटचालीसाठी शाळेला शुभेच्छा दिल्या.पालक मेळाव्यास शाळा व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष मारोती कुळसंगे उपस्थित होते.तसेच चव्हाण सर कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी प्रकल्प चंद्रपूर हे सुद्धा मेळाव्यास उपस्थित होते.
संचालन सूर्यकांत पुणेकर यांनी केले तर आभार विजय रंदये माध्यमिक शिक्षक यांनी मानले.या प्रसंगी विदयार्थी,पालक ग्रामस्थ,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणी शाळेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते. शिक्षकवृंद अधीक्षक सर्व वर्ग चार कर्मचारी यांच्या प्रयत्नामुळे सदर सभा यशस्वीरित्या पार पडली.कार्यक्रमा अंती सर्व उपस्थितानि भोजनाचा आस्वाद घेतला.


