Home Breaking News #Ballarpur • आश्विनी दालवनकर यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान

#Ballarpur • आश्विनी दालवनकर यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान

253

#Ballarpur

• आश्विनी दालवनकर यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान

सुवर्ण भारत:शंकर महाकाली (संपादक)

बल्लारपूर : आश्विनी ज्योती देवराव दालवनकर राहणार मुरलीधर मंदिर जवळ बल्लारपूर
यांना  दिनांक 13/04/2025 ला संजीवनी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित ‘सन्मान निष्ठेचा, गौरव कर्तृत्वाचा सन्मान महाराष्ट्राच्या गुणवंताचा या कार्यक्रमाप्रसंगी ,चेअरमन डॉ. ज्ञानेश्वर सानप यांच्या अध्यक्षते खाली नासिक येथे मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत क्रिडा क्षेत्रातील शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आश्विनी दालवनकर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
टेनिस बाॅल ,क्रिकेट, आदी क्रिडा क्षेत्रातील संबंधित केलेल्या उल्लेखनीय सहभागासाठी हा पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे. क्रिडा क्षेत्रातील शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कारसह आजपर्यंत त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळविले आहेत. याबद्दल त्यांचे परिसरातून अभिनंदन होत आहे.