Home Breaking News #Jivti • जिवती तालुक्यातील BSNL नेटवर्कच्या लपंडावाणे 11वी ऑनलाईन प्रवेश विद्यार्थ्यांसाठी तारेवरची...

#Jivti • जिवती तालुक्यातील BSNL नेटवर्कच्या लपंडावाणे 11वी ऑनलाईन प्रवेश विद्यार्थ्यांसाठी तारेवरची कसरत

199

#Jivti
• जिवती तालुक्यातील BSNL नेटवर्कच्या लपंडावाणे 11वी ऑनलाईन प्रवेश विद्यार्थ्यांसाठी तारेवरची कसरत

सुवर्ण भारत:कृष्णा चव्हाण
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

जिवती : तालुक्यातील बीएसएनएल नेटवर्कच्या लपंडावाने अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची तारीख जवळ आली असली तरी नेटवर्क गेल्या पाच दिवसापासून बंद असल्यामुळे अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया विद्यार्थ्यांची पूर्ण होऊ शकली नाही त्यामुळे संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली असून. विद्यार्थ्यांना अकरावी मध्ये प्रवेश मिळेल की नाही? अशी चिंता त्यांचे पालक व विद्यार्थ्यांना पडलेली आहे. तसेच इतर नेटवर्कची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे बँकेतील कामे, पंचायत समिती,तहसील मधील विद्यार्थ्यांचे उत्पन्न दाखले व इतरही दाखले तसेच पंचायत समितीमधील ऑनलाइन जन्म नोंद मृत्यू प्रमाणपत्र यांच्यासाठी विद्यार्थ्यांना ताटकळत बसावे लागत आहे व गेल्या पाच दिवसापासून नेटवर्क अभावी तहसील, पंचायत समिती, बँका ऑनलाईन शेतकऱ्यांची व विद्यार्थ्यांची कामे, ऐन पेरणीच्या तोंडावर शेतीचे मसागतीचे कामे सोडून कार्यालयात चकरा माराव्या लागत आहे. त्याचा फटका सर्वसामान्य गरीब शेतकरी व विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात होत आहे व पाच दिवसापासून त्यांच्या चक्रा सतत कार्यालयात होत असल्याने आर्थिक भूृदंड ही सोसावा लागत आहे तसेच अनेक बँकेत तासंतास शेतकरी विद्यार्थी, वयोवृद्ध, निराधार व इतरही कर्मचाऱ्यांना वाट बघत बसावे लागत आहे त्यामुळे या संदर्भातली माहिती बीएसएनएलचे वरिष्ठ अधिकारी यांना फोन द्वारे संपर्क करू नहीं ते या संदर्भात दखल घेत नसल्याने बीएसएनएलचे टावर ही शोभेची वस्तू बनले असल्याची चर्चा तालुक्यातील नागरिकाकडून चर्चेला जात आहे तेव्हा या संदर्भात वरिष्ठ अधिकारी गांभीर्याने घेऊन ही नेटवर्कची व्यवस्था सुरळीत करतील काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे व नेटवर्कची सुविधा तात्काळ सुरू करावी असे पत्र बीएसएनएलचे मुख्य प्रबंधक यांना निवेदनाद्वारे श्री सुग्रीव गोतावळे यांनी दिले आहे त्यामुळे यावर वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतील? व तालुक्यातील सर्वच बीएसएनएलचे टॉवरचे सुविधा तात्काळ सुरळीत करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे?