Home Breaking News • AITUC च्या जनरल कौन्सिलची बैठक राजस्थानमधील जयपूर येथे संपन्न •...

• AITUC च्या जनरल कौन्सिलची बैठक राजस्थानमधील जयपूर येथे संपन्न • 9 जुलै देशव्यापी संपाची हाक!

178

• AITUC च्या जनरल कौन्सिलची बैठक राजस्थानमधील जयपूर येथे संपन्न

• 9 जुलै देशव्यापी संपाची हाक!

सुवर्ण भारत:चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण.

ज्येष्ठ कामगार-संघटन नेते एम.एल. यादव यांनी लाल झेंडा फडकावला आणि AITUC राजस्थानचे सरचिटणीस कुणाल रावत यांनी स्वागत भाषण केले. AITUC च्या सरचिटणीस अमरजीत कौर यांनी राजकीय घडामोडींचा अहवाल परिषदेसमोर ठेवला आणि ९ जुलै रोजी होणाऱ्या अखिल भारतीय सार्वत्रिक संपाला भव्य यश मिळवून देण्याचे आवाहन केले.या बैठकीला देशभरातील 24 राज्यांमधून 243 प्रतिनिधी उपस्थित होते यामध्ये कामगार हिताचे किमान वेतन सह विविध 22 ठराव पास करण्यात आले.