आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार आरोग्यसेवा समितीच्या माध्यमातून रुग्णांच्यासेवेचे कार्य निरंतरपणे सुरु: विवेक बोढे
रुग्णांची ६६ वी तुकडी मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी रवाना

घुग्घुस: सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र आणि सुधीरभाऊ मुनगंटीवार आरोग्य सेवा समिती महाराष्ट्रातर्फे रविवार, १५ जुन रोजी दुपारी सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातून आमदार देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची ६६ वी तुकडी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या नेतृत्वात रवाना करण्यात आली.
सर्वांची शस्त्रक्रिया मोफत आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र ही करणार आहे.
याप्रसंगी बोलतांना भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे म्हणाले, आज घुग्घुस येथील सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र आणि सुधीरभाऊ मुनगंटीवार आरोग्य सेवा समिती महाराष्ट्राच्या माध्यमातून घुग्घुस परिसरात रुग्णसेवेचे कार्य निरंतरपणे सुरु आहे आता ६६ वी रुग्णांची तुकडी मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी रवाना करण्यात येत आहे. सुधीरभाऊ मुनगंटीवार आरोग्य सेवा समितीच्या माध्यमातून घुग्घुस परिसरातील १० हजारांच्यावर रुग्णांना नि:शुल्क मदत करण्यात आली आहे.
यावेळी भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे, माजी जिल्हा परिषद सदस्य चिन्नाजी नलभोगा, भाजयुमोचे गणेश कुटेमाटे, शंकर सिद्दम, प्रमोद भोस्कर, धनराज पारखी, डॉ. सुनील राम, हेमंत कुमार, अजय लेंडे, हनुमान खडसे आदींची उपस्थिती होती.


