घुग्घुस येथील शिवसेना (उबाठा) तर्फे विमान दुर्घटनेतील प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली
दि.१३ जून २०२५ रोज शुक्रवारला सायंकाल रोजी विमान अपघातात मृत्यू पावलेल्या सर्व नागरिकांना आज घुग्घुस येथील शिवसेना (उबाठा) कमिटीच्या वतीने गांधी चौक घुग्घुस येथेअत्यंत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
अहमदाबाद येथे घडलेल्या भीषण विमान अपघातात अनेक निष्पाप जीवांनी आपले प्राण गमावले. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे.
ईश्वर या सर्व दिवंगत आत्म्यांना शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखद प्रसंगी धैर्य देवो हीच प्रार्थना करण्यात आली.
याप्रसंगी शिवसेना( उबाठा) अध्यक्ष चेतन (बंटी)घोरपडे ,हेमराज बावने (युवा सेना उपजिल्हा प्रमुख), जेष्ठ नेते प्रभाकर चिकनकर,वरिष्ठ नेते बाळू चिकनकर,वरिष्ठ नेते अजय जोगी,चेतन बोबडे (लोकसभा अध्यक्ष युवासेना कॉलेज कक्ष), गणेश शेंडे वरिष्ठ नेते,अमित बोरकर,योगेश भांदककर उपतालुका प्रमुख,जेष्ठ नेते रघुनाथ धोंगडे,गणेश उईके आदिवासी जेष्ठ नेते, मारोती जुमनाके – सामाजिक कार्यकर्ता ,वेदप्रकाश मेहता, जेष्ठ नेते – गजानन बांदुरकर,लक्ष्मण बोबडे,अनुप कोंगरे, किशोर चौधरी, हर्ष चौधरी,राजू नाथर, प्रफुल खोंडे, आणि सर्व शिवसैनिक उपस्थित होते.


