Home Breaking News लॉयड्स इन्फीनाईट फाउंडेशन घुग्घुसतर्फे दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य साहित्य वितरण कार्यक्रम

लॉयड्स इन्फीनाईट फाउंडेशन घुग्घुसतर्फे दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य साहित्य वितरण कार्यक्रम

183

लॉयड्स इन्फीनाईट फाउंडेशन घुग्घुसतर्फे दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य साहित्य वितरण कार्यक्रम

घुग्घुस : लॉयड्स इन्फीनाईट फाउंडेशन आणि लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने सांवगी ग्रामपंचायत मध्ये दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य साहित्य वाटप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात व्हीलचेअर,आराम खुर्ची,आधार काठी, शौचालय चेअर, रुग्णांसाठी बेड, कमर पट्टा अशा विविध प्रकारच्या आरोग्य साहित्याचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड उपमहाप्रबंधक संदीपान बागची कार्यक्रमाच्या अध्यक्षा ग्रामपंचायत सावंगी च्या सरपंचा शालूताई ठाकरे यांच्या हस्ते झाले .
प्रमुख पाहुणे म्हणून विजय पिदूरकर माजी जिल्हा परिषद सदस्य यवतमाळ, लॉयड्स इन्फीनाईट फाउंडेशनच्या सहायक महाप्रबंधक विदया पाल, ग्रामपंचायत उपसरपंच आत्राम लॉयड्स इन्फीनाईट फाउंडेशनचे उपव्यवस्थापक दिपक साळवे, ग्रामपंचायत सचिव पथाडे आशावर्कर व ज्येष्ठ नागरिक यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात एकूण १०१ दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये व्हीलचेअर,आराम खुर्ची, आधार काठी, शौचालय चेअर, रुग्णांसाठी बेड, कमर पट्टा यांचा समावेश होता.
या उपक्रमाबद्दल माहिती देताना विदया पाल म्हणाल्या,”दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात सुधारणा करणे हे आमचे सामाजिक दायित्व आहे.लॉयड्स इन्फीनाईट फाउंडेशन आणि लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड नेहमीच अशा उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी तत्पर असतात.”
विजय पिदूरकर माजी जिल्हा परिषद सदस्य यवतमाळ यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले आणि म्हणाले, “या आरोग्य साहित्यामुळे गावकऱ्यांचे जीवन सुखकर होईल. ग्रामपंचायत नेहमीच अशा सामाजिक कार्यांना प्रोत्साहन देत राहील.”
कार्यक्रमाचे संचालन अनुराग मते यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीरंग पोतराजे , यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शीतल कौरासे, सौ.मोनिका ठाकरे, सौ. प्रिया पिंपळकर , सौ. मनीषा बरडे यांनी अथक प्रयत्न केले.
या कार्यक्रमामुळे दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा आधार मिळाला आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद या उपक्रमाची यशस्विता दर्शवत होता.