#Ghugus
• लॉयड्स मेटल्स उत्पादक विभागाच्या वतीने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार
सुवर्ण भारत:पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
घुग्घुस:दिनांक २०जुन २०२५ रोजी लाॅयड्स मेटल्स उत्पादक विभागाच्या वतीने दिनांक २० जुन रोजी लाॅयड्स मेटल्स उत्पादकअस्थायी कर्मचारी कामगार मधुकर धोपटे यांचा सेवानिवृत्ती चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यानिमित्त सेवानिवृत्त झालेल्या लाॅयड्स मेटल्स विभागाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला,भेतवस्तु देण्यात आले व त्यांच्या पुढच्या वाटचाली करिता शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी लाॅयड्स मेटल्स विभागाचे वरीष्ठ प्रबंधक गुणाकार शर्मा,पियुष गोयल,रवि शुक्ला, श्यामल जना, इलेक्टीकल विभागाचे प्रमुख कुलदीप सिंग,युनियनचे संयुक्त महामंत्री राजास्वामी जंगम,मनोज आत्राम,मोरेश्वर धांडे व परिसरातील विभाग कर्मचारी आदी उपस्थित होते.
