#Jivti
जिवती तालुक्यात अनेक शाळा महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात साजरा
सुवर्ण भारत: कृष्णा चव्हाण
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
जिवती – जिवती तालुक्यात अनेक शाळा महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात आला. कै.आण्णाभाऊ साठे उच्च माध्यमिक विद्यालय, विदर्भ महाविद्यालय ,गोंडवाना महाविद्यालय ,उसेंडी महाविद्यालय, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा टेकामांडवा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंभेंजरी ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी मिळून आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात योगाचे अनेक कवायती साजरा करण्यात आले.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही एन लोडे,वि.के वावरे ,आर. मालेकर, एस गोतावळे, वाघमारे, पेंडोर,जीवने, अहिरकर नामवाड शिक्षक वर्ग व विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन योग दिन साजरा करण्यात आला यावेळी योग दिनाचे महत्त्व आरोग्यासाठी किती महत्त्वाचे आहे यावरही मार्गदर्शन करण्यात आले.
