Home Breaking News • वरोरा पोलिसांची गोवंश घेऊन जाणाऱ्यांवर कारवाई • २,६०,००० हजाराचा मुद्देमाल...

• वरोरा पोलिसांची गोवंश घेऊन जाणाऱ्यांवर कारवाई • २,६०,००० हजाराचा मुद्देमाल जप्त

174

• वरोरा पोलिसांची गोवंश घेऊन जाणाऱ्यांवर कारवाई

• २,६०,००० हजाराचा मुद्देमाल जप्त

सुवर्ण भारत : खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी,वरोरा

वरोरा : वरोरा पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार एक पिकअप वाहन तीन बैल,गोवंश घेऊन जात आहे अशी माहिती मिळाली.त्यानुसार पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे , सपोनी भस्मे,पोहवा पवार. पोहवा किशोर बोंळे यांनी स्थानिक लोकांच्या मदतीने पीकअप वाहन क्र.एम ए ४८ ए जी ३१७४ रोखून पंचासमक्ष झडती घेतली असता सदर वाहनांमध्ये अवैध रित्या निर्दयपणे तीन बैल एकूण किंमत ६०.००० हजार रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. जप्त करून सदरचे बैल गौरक्षन वरोरा येथे दाखल करण्यात आले.तसेच पीकअप वाहन ची किंमत २००००० ते सुद्धा पोलिसांनी जप्त केले.एकूण २,६०,००० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.सदरची.कारवाई २४ जूनच्या रात्रौ दरम्यान करण्यात आली.
एक अल्पवयीन मुलगा याला न्यायमंडळ समक्ष हजर केले असता त्याला पालकाचे ताब्यात देण्यात आले. तसेच आरोपी प्रणय दामोधर चावरे रा.बोडखा,जिल्हा चंद्रपूर यास सदर गुन्ह्यात अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक चंद्रपूर,अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर,सहा.पोलीस अधीक्षक ,तथा पोलीस उपविभागीय अधिकारी वरोरा नयोमी साटम यांचे मार्गदर्शनाखाली वरोरा पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे,सहा.पोलीस निरीक्षक शरद भस्मे, पोहवा पवार,पोहवा किशोर बोंळे आदींनी केली.