Home Breaking News • आनंदनिकेतन कनिष्ठ महाविद्यालयात गुणगौरव सोहळा संपन्न

• आनंदनिकेतन कनिष्ठ महाविद्यालयात गुणगौरव सोहळा संपन्न

84

• आनंदनिकेतन कनिष्ठ महाविद्यालयात गुणगौरव सोहळा संपन्न

सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी, वरोरा

वरोरा: महारोगी सेवा समिती द्वारा संचालित आनंद निकेतन कनिष्ठ महाविद्यालयात बारावी परीक्षा विशेष प्राधान्य घेऊन उत्तीर्ण होणारे विद्यार्थ्यांचे गुणगौरव व कौतुक समारंभ आयोजित करण्यात आला.अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मृणाल काळे सर प्रमुख उपस्थिती उपप्राचार्य राधा सवाने व प्रा.अनिल तरोळे यांची होती.मुख्य कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी पालक आणि गुणवंत विद्यार्थी यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
गुणवंत विद्यार्थ्यांना पुष्प स्मृतिचिन्ह आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले..कार्यक्रमाचे प्रास्ताविक तरोळे सरांनी केले
या याप्रसंगी कुमारी अभिष्री नलगिंटवार,अश्विन धोटे रितेश थूल या गुणवंत विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पालकांमधून श्री.रवी नलगिंटवार, येरमे यांनी विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात कशीश नागरीकर हिने पसायदानाने केली. व सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन मुंडे सरानी केले आणि आभार प्रदर्शन जोशी सरांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजना करिता लांजेवार मॅडम, मत्ते सर, बारेकर सर यांचे विशेष सहकार्य लाभले.
सर्व शिक्षकांचे सहकार्याने कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.