
जिवती येथे काँग्रेस कार्यकारिणी विस्तार सोहळा : आषाढी एकादशी निमित्त दिंडी महोत्सव
सुवर्ण भारत: कृष्णा चव्हाण
चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर
जिवती : जिवती तालुका काँग्रेस आणि काँग्रेसच्या विविध सेल पदाधिकाऱ्यांची नियुक्ती व कार्यकारिणी विस्तार सोहळ्याचे आयोजित करण्यात आले. सोबतच महाराष्ट्राची समृद्ध परंपरा असलेल्या आषाढी एकादशी निमित्त वारकरी बांधवाच्या उपस्थितीत दिंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी दिंडी महोत्सवाची सुरुवात विठ्ठल रखुमाई मंदिर बस स्टॉप, जिवती येथून करण्यात येऊन समारोप विदर्भ कॉलेज येथे करण्यात आला. दंडी महोत्सवात स्थानिक नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यावेळी नवनियुक्त तालुका अध्यक्ष डॉ. अंकुश गोतावळे यांनी केलेल्या जिवती काँग्रेस कार्यकारिणीच्या विस्तार व कार्यकर्ता मेळाव्यात चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी नवनियुक्त पदाधिकारी व संपूर्ण कार्यकारिणी सदस्यांचे अभिनंदन केले. आणि काँग्रेस विचारसरणी, ध्येय, धोरणे, काँग्रेसची विकासकामे, लोककल्याणकारी भुमिका तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवून लोकशाही, संविधान रक्षणासाठी येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत क्षेत्रात काँग्रेसचा झेंडा फडकविण्याचे आवाहन केले. यावेळी राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हा लढवय्या असून कोणत्याही परिस्थितीत आपल्या परिसरातील समस्या सोडविण्यासाठी आणि जनतेच्या न्याय्यासाठी तो सदैव तत्पर आहे असे मत व्यक्त केले. तर तालुकाध्यक्ष डॉ. अंकुश गोतावळे यांनी देखील जिवती तालुक्यातील जेष्ठ व युवक काँग्रेस कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पून्हा काँग्रेसचा गड अधिक मजबूत करण्यासाठी परिश्रम घेण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे हे होते. प्रमुख अतिथी राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, आदिवासी नेते भीमराव पा. मडावी, गणपत आडे, प्रा. सुग्रीव गोतावळे, भोजू पा. आत्राम, कलीमभाई शेख, अजगर अली, पंढरी गायकवाड, मारोती मोरे, दत्ता तोगरे,माधव डोईफोडे, रामदास रणवीर, सुमनबाई शेळके, शब्बीर शेख, ताजुदीन शेख , तिरुपती पोले, गणेश वाघमारे, दत्ता गायकवाड, बंडू राठोड, केशव भालेराव, अमोल कांबळे, सिताराम मडावी,माधव शेंबडे मामा, मुन्नीरभाई, विजय कांबळे, बाळू पतंगे, देविदास साबणे, बाबाराव कांबळे, बाजीराव पा. वल्का,उत्तम कराळे, नामदेव जुमनाके यासह जिवती काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशन चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.




