• नगरपरिषदे तर्फे शहरातील घरपट्ट्यांचा ठराव घेऊन जिल्हाधिकऱ्यांना पाठवा
• काँग्रेसचे नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

घुग्घूस : शहरातील अमराई, तिलक नगर, बँक ऑफ इंडिया मागील वस्ती, शालिकराम नगर, आंबेडकर नगर, शास्त्री नगर, बंगाली कॅम्प, गोपाल नगर, अजगर नाला परिसरातील नागरिकांना तहसील कार्यलयातून सात दिवसात महसूलच्या जमिनी वरील घर हटविण्याचे नोटीस देण्यात आलेले आहे.
शासन तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या दिशा निर्देशानुसार वर्ष 2011च्या पूर्वी पासून महसूलच्या जमिनीवर अतिक्रमण करून राहणाऱ्या नागरिकांना घरपट्टे देण्याचा आदेश आहे.
याकरिता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती निर्माण करण्यात आली असून या समितीत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांचा ही समावेश आहे.
नगर परिषदेने घरपट्ट्या संदर्भातील ठराव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला नसल्यानेच शहरातील नागरिकांना तहसीलदार यांच्या कार्यलया कडून शहरातील 1300 नागरिकांना नोटीस देण्यात आलेले आहे.
गेल्या 50 वर्षांपासून शहरात राहणाऱ्या नगरपरिषदेला नियमित कर देणाऱ्या नागरिकांना प्रचंड मानसिक व शारीरिक त्रास भोगावा लागला आहे.
ही नागरिकांची घरे शासकीय नियमानुसार पाडताच येत नसल्याने या नोटीसना स्थगती देण्यात आलेली आहे.
नागरिकांना परत त्रास होऊ नये याकरिता संपूर्ण शहराचा अभ्यास करून घरपट्ट्यांचा ठराव निर्माण करून जिल्हाधिकारी यांना तातळीने पाठवावा याकरिता काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या नेतृत्वात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निलेश रांजनकर यांना निवेदनातून मागणी केली आहे.
याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर, जिल्हा महासचिव अलीम शेख, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार,जिल्हा सचिव अजय उपाध्ये,इंटक उपाध्यक्ष शहजाद शेख,तालुका सचिव विशाल मादर,तालुका उपाध्यक्ष श्रीनिवास गुडला, एस.सी.सेल तालुकाध्यक्ष राजकुमार वर्मा,एन. एस. यु. आय शहर अध्यक्ष आकाश चिलका,बालकिशन कुळसंगे,रोहित डाकूर, दिपक पेंदोर,विजय माटला, सुनील पाटील, कुमार रुद्रारप,दिपक कांबळे,कपिल गोगला,सूरज मिश्रा,अनवर सिद्दीकी,शहंशाह शेख,अंकुश सपाटे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


