Home Breaking News • वंचित आघाडीचा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर आक्रोश मोर्चा

• वंचित आघाडीचा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर आक्रोश मोर्चा

138

• वंचित आघाडीचा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर आक्रोश मोर्चा

सुवर्ण भारत: विशाल डुंबेरे
जिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर

बल्लारपूर : वंचित बहुजन आघाडी तर्फे महाराष्ट्र

 

जीवन प्राधिकरण कार्यालयावर मोर्चाचे ७ जुलै रोजी आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बल्लारपूर शहरात पाणीपुरवठा अशुद्ध व गढूळ असल्यामुळे तसेच अवास्तव बिल आकारणीने नागरिक त्रस्त आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी मागील सहा महिन्यापासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला वेळोवेळी निवेदन देऊन, निदर्शने करून विनवणी केली परंतु प्राधिकरणाच्या व्यवहारांमध्ये सुधारणा न झाल्यामुळे व उलट तिथल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उर्मटपणा दिवसेनदिवस वाढतच असल्यामुळे अखेर वंचित बहुजन आघाडीने आंदोलनाचे अस्त्र उपसले आहे व येत्या ७ जुलै ला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

बल्लारपूर शहराचे वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष उमेश जनार्दन कडू यांनी शहरातील नळ ग्राहकांना आवाहन केले आहे की आक्रोश मोर्चामध्ये सहभागी होताना आपण आपल्या सोबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या बिलाची झेरॉक्स प्रत तसेच आपल्या आधार कार्डची झेरॉक्स सोबत आणून वंचितच्या प्रतिनिधी कडे जमा करावी व मोर्चामध्ये सर्व त्रस्त ग्राहकांनी आपल्या रास्त मागण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व बल्लारपूर शहराच्या नळग्राहकांची एकजूट दाखवून प्राधिकरणाला नमवन्यासाठी हजारोंच्या संख्येत सहभागी व्हावे असे आव्हान केले आहे व महिला आघाडी शहराध्यक्षा रेखाताई पागडे यांनी देखील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. सर्वमाहिती वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर शहर चे महासचिव गौतम रामटेके यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.