Home Breaking News • सरपंचावर जीवघेणा हल्ला – महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेकडून निषेध

• सरपंचावर जीवघेणा हल्ला – महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेकडून निषेध

252

• सरपंचावर जीवघेणा हल्ला – महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेकडून निषेध

सुवर्ण भारत: रवि बंडीवार
कोरपना/गडचांदुर,प्रतिनिधी

नांदा फाटा – कोरपना तालुक्यातील बाखर्डी ग्रामपंचायतीचे सरपंच   अरुण विजयराव रागीट यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याच्या घटनेने राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेने या घटनेचा तीव्र निषेध करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

सरपंच हा गावाचा प्रमुख नागरिक असतो आणि गावाच्या विकासात त्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. मात्र, मागील काही काळात सरपंचांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ होत असल्याची चिंता संघटनेने व्यक्त केली आहे. सरपंचांवर हल्ले करणे, धमक्या देणे, हे लोकशाही व्यवस्थेच्या विरोधात असून ते खपवून घेतले जाणार नाही, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

बाखर्डी गावात पाणी पुरवठा योजनेंतर्गत जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामात अभियंता आणि संबंधित अधिकाऱ्यांची शिथीलता असल्याने सरपंच अरुण रागीट यांनी तक्रार केली होती. या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

या घटनेनंतर महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, दोषींवर त्वरित कारवाई करून सरपंचांना पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी सरपंच संघनेचे जिल्हा अध्यक्ष नंदकिशोर वाढई, देवा पाचभाई प्रांत अध्यक्ष सरपंच संघटना, आवारपूर सरपंच बाळकृष्ण काकडे, निमणी सरपंच अतुल धोटे उपस्थित होते या निवेदनातून कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. निवेदनावर अनेक सरपंच व पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.